रविवारी 26 मार्च रोजी केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले तासगाव दौऱ्यावर : बलगवडे येथे विकासकामांचा लोकार्पण सोहळा....
डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या जागेची पहाणी करणार : संदेश भंडारे
तासगाव प्रतिनिधी -
येत्या रविवार दि 26 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदासजी आठवले तासगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून बलगवडे ता. तासगाव येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु करण्यात येणार असून कॉलेजच्या जागेची पहाणी करण्यासाठी तसेच गावातील विविध विकासाकामाचा लोकार्पण सोहळा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री तथा कामगार मंत्री ना सुरेश भाऊ खाडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारे यांनी दिली.
रविवारी 26 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता बलगवडे येथील शाळेच्या ग्राउंडवर हा समारंभ होत असून याप्रसंगी रिपाईचे राष्ट्रीय नेते ईशान्य भारताचे प्रभारी विनोद निकाळजे, माजी महापौर तथा प्रदेश उपाध्यक्ष विवेकराव कांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा मार्केट समितीचे माजी सभापती अविनाशकाका पाटील, तासगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अतुल डांगे, सचिव ऍड सुभाष खराडे, बलगवडे सरपंच हणमंत शिंदे, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा आदाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, संजयराव कांबळे, प. महाराष्ट्र सरचिटणीस सांगलीचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, अखिल भारतीय बेरड रामोशी समाज कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष मोहन मदने, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश तिरमारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी, माजी सरपंच अनिल पाटील, दलितमित्र भिमरावभाऊ भंडारे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, रिपाई तालुकाध्यक्ष प्रविण धेंडे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप माने, उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, भाजपा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील, ऍड बाळासाहेब गुजर, ऍड तुकाराम कुंभार, ऍड गजानन खुजट ऍड सतीश साठे, ऍड शैलेश हिंगमिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. यावेळी नवीन नियुक्त सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात येणार असून गावातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या जागेची पहाणी करन्यासाठी केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले साहेब येणार आहेत, परिसरातील विविध विकास कामे याबाबत थेट जनतेला भेटून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत तरी या समारंभासाठी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष संदेश भंडारे यांनी केले.
तालुक्याच्या दृष्टीने सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी लॉ कॉलेज नवसंजीवनी ठरेल असे मत माजी सरपंच अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी राहुल थोरात, विष्णू तोडकर, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, मधुकर शिंदे, शुभम पाटील, संभाजी माने, समाधान चव्हाण आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.