कुपवाड एमआयडीसी मध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या ५० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कुपवाड एमआयडीसी मध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या ५० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी




कुपवाड एमआयडीसी मध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या ५० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी
कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याला अखेर यश – चेअरमन सतीश मालू

कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने सलग ३ वर्षे ई.एस.आय. चे (राज्य कामगार विमा योजना) रुग्णालय उभारणीसाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी मान्यता दिल्याने ५० खाटांचे हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून कृष्णा व्हॅली चेंबरच्या प्रयत्नाला यश मिळाले असल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, संचालक रमेश आरवाडे यांनी दिली.


यावेळी बोलताना सतीश मालू म्हणाले की, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभे करण्यासाठी भूखंड मागणी मिळणेकरिता शासकीय पातळीवर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य कामगार विमा योजना यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीशी सुद्धा संपर्क साधण्यात आला. कामगार व त्यांच्या कुटुंबीयाना औषधोपचार योग्य रितीने मिळत नसल्याबाबत वारंवार कळविण्यात आले होते. यामध्ये सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी तत्परतेने याबाबत लक्ष घालून मुंबई ऑफिसशी शिफारस देवून त्यात त्यांनी स्वत: लक्ष घातले. परिणामी मुंबई ऑफिसने या पत्रव्यव्हाराची तात्काळ दखल घेतली. कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने या सर्व पत्रव्यवहाराचा पाठपुरावा संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी व्यक्तीश: ७ ते ८ वेळा मुंबई कार्यालयास संपर्क साधून मंजुरी मिळविण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.


राज्य कामगार विमा योजनेने विमाधारकांची ५ वर्षातील वाढ विचारात घेऊन कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड क्र. पी – ६३ (१००० स्क्वे.मी. क्षेत्रफळ) येथे ५० खाटांचे रुग्णालय उभारणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

या तात्विक मागणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सांगलीचे प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळाले आहे. लवकरच कागदपत्रांची पूर्तता केलेनंतर भूखंड अदा केला जाईल व गतीने रुग्णालय उभारणी केली जाईल असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक हरिभाऊ गुरव, दिपक मर्दा, रतीलाल पटेल, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, रागिणी पाटील, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील, दिनेश पटेल, व्यवस्थापक अमोल पाटील उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली