Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राज्याच्या अर्थसंकल्पात नुसतीच आश्वासनांची खैरात पृथ्वीराज पाटील यांची प्रतिक्रिया




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

राज्याच्या अर्थसंकल्पात नुसतीच आश्वासनांची खैरात...
पृथ्वीराज पाटील यांची प्रतिक्रिया




सांगली, दि. ९ :
अर्थमंत्री म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची नुसतीच खैरात आहे. प्रत्यक्षात लोकांच्या हातात काही पडेल का ? याविषयी शंकाच आहे, अशी प्रतिक्रिया सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.

ते म्हणाले, चालू वर्ष आणि आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे, हे लक्षात ठेवून श्री. फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे, परंतु राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ठोस असे कुठलेच धोरण यामध्ये दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावरची ही आश्वासनांची खैरात आहे. 

ते म्हणाले, अर्थसंकल्पातील या घोषणा पूर्ण करण्याशी  शिंदे - फडणवीस सरकारला काही देणे घेणे नाही, त्यामुळे घोषणा करायला त्यांचे काय जाते, असेच म्हणावे लागेल.


श्री. पाटील म्हणाले, विकास आघाडी सरकारने आपल्या कारकिर्दीमध्ये जे उपक्रम राबवले, त्यापैकी बऱ्याच उपक्रमांची नावे बदलून त्यांनी त्याच योजना नव्याने जाहीर केल्या आहेत, हे स्पष्टपणे दिसते, शेती आणि महिला विषयीच्या अनेक योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. 'पंचामृत' या नावाने हा अर्थसंकल्प सादर केला आहे, पण ते पंचामृत आहे की, आणखी काही हे काळच ठरवेल. लोकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. एक प्रकारची दिशाभूलच आहे. 

राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे, त्यामुळे द्राक्ष बागा, ऊस, काढायला आलेली रब्बी पिके आणि अन्य शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यासाठी मोठी तरतूद आवश्यक आहे. शेती ऊर्जा पाणी अशा विविध क्षेत्रात भरपूर तरतूद करणे आवश्यक होते, पण तेही या जुमलेबाज सरकारला जमले नाही, असेही श्री पाटील यांनी म्हटले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.