निर्भीड व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार युवराज मोरे यांना संत रोहिदास विकास फांउडेशनचा "महाराष्ट्र समाजरत्न" पुरस्कार प्रदान...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

निर्भीड व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार युवराज मोरे यांना संत रोहिदास विकास फांउडेशनचा "महाराष्ट्र समाजरत्न" पुरस्कार प्रदान...लोकसंदेश न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी

निर्भीड व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार युवराज मोरे यांना संत रोहिदास विकास फांउडेशनचा "महाराष्ट्र समाजरत्न" पुरस्कार प्रदान...

पुणे- संत रोहिदास विकास फांउडेशन महाराष्ट्र राज्यच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त चर्मकार समाजातील विविध क्षेत्रांत महत्वपूर्ण योगदान देत असलेल्या  व्यक्तिंना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या सामाजिक,राजकीय,पत्रकारिता क्षेत्रातील कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित नावामध्ये ओळख निर्माण केलेल्या मा युवराज मोरे यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार संत रोहिदास विकास फांउडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सुरेखाताई दिघे यांच्या हस्ते व राज्य सचिव देवाप्पा शिंदे, राज्य महिला संपर्क प्रमुख रुपालीताई टिके,राज्य सल्लागार राजेश नांदवीकर,राज्य खजिनदार निव्रूत्ती दिघे,कार्याध्यक्ष डॉ संजू भटकर,मा.मोतीराय यांच्या उपस्थितीत देण्यात आला.श्री. युवराज मोरे हे गेली पंधरा वर्षे झाली सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात संत रोहिदास चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे ते सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिले.त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ आणि जनसंपर्क पाहून संघटनेने त्यांना राज्य संघटक,जिल्हाध्यक्ष व पुढे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली ती आजतागायत ते एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे सांभाळत आहेत तथा आपल्या पदाला न्याय देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.समाजातील कोणत्याही प्रकारची वैयक्तिक पातळीवर असो सामाजिक अडचणी ते तात्काळ उपलब्ध राहून त्यातून मार्ग काढण्यात त्यांचा मोठा हातखंडा आजही कायम आहे. अन्याय, अत्याचार झालेल्या समाजातील घटकाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत माघार घेणे कधीच पसंत केले नाही.
शैक्षणिक बाबतीत शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना जातीचे दाखले,उत्पन्नाचे दाखले, समाजकल्याण विभागाकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती, अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती अशा अनेक बाबतीत न्याय दिला. अनुसूचित जातींसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले यामध्ये रमाई घरकुल योजना,विहीर मंजुरी,शेतीला लागणारे साहित्य,औजारे,औषध फवारणी पंप,पाईपलाईन, वीज जोडणी यासारख्या अनेक कार्यातून शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या बांधवांना मिनी ट्रँक्टर उपलब्ध करून सहकार्य केले.जेष्ठ नागरिकांना,विधवा, परित्यक्ता महिलांना संजय गांधी निराधार योजनेतून महिना पेन्शन योजना मंजूर करून आर्थिक हातभार लावण्यासाठी सहकार्य केले.गर्भवती महिलांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सहकार्य करत शासकीय मदत उपलब्ध करून दिली.अपघातग्रस्त ठिकाणी एँब्मुलन्स उपलब्ध करून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करत शेकडो लोकांना सहकार्य केले.
2019 आणि 2021मध्ये अतिवृष्टीने आलेल्या महापुरात अनेक कुटूंबावर संकट कोसळले होते अशावेळी अन्न-धान्य,जेवण वाटप,जीवनावश्यक वस्तू, औषधे वाटप करण्यात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.कोरोनासारख्या महाभयंकर महामारीच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले.अनेक रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली.एवढेच नाही तर कोरोनामध्ये दगावलेल्या रुग्णांना शववाहिका उपलब्ध करून पेशंटचे अंतिम कार्य करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. यासाठी स्वतः देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले व मरणाच्या दारातून परत आले.
स्वतः संस्थापक अध्यक्ष असलेल्या पोलिस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात पोलीस प्रशासनासह रस्त्यावर उतरले व बंदोबस्त करण्यासाठी योगदान दिले. यासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही करण्यात आले.समाजातील प्रश्नावर आवाज उठवण्याची त्यांची तळमळ पाहून हिरकणी न्यूज मध्ये त्यांनी निर्भिडपणे अन्याय, अत्याचार,अवैध धंदे,गुन्हेगारी विषयांवर बातम्या करत आवाज उठवला. पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी ते उपसंपादक पदापर्यंतची आजतागायत यशस्वी जबाबदारी पार पाडली.संघटन करण्यात मोलाचे योगदान पाहून अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. लोककलावंत तसेच अनेक कलाकार यांच्यासाठी गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्या सह्याद्री फिल्मस् अँड इव्हेंट मँनेजमेंट महाराष्ट्र राज्य या संस्थेने राज्य उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपवली.
सह्याद्री फिल्मस् अँड इव्हेंट मँनेजमेंटच्या वतीने आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित केले, लोकराजा शाहू महाराज ट्रस्टच्यावतीने लोकराजा शाहू गौरव प्रेरणा समाज भूषण 2022 चा उत्कृष्ट निर्भीड पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले.रुद्राणी फांउडेशन सांगली यांच्यावतीने सामाजिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.भारतीय मजदूर संघ, कोल्हापूर यांचे वतीने कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.चर्मकार ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य व संत रोहिदास कला,क्रीडा,शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील अडीअडचणी,प्रश्नांबाबत अहोरात्र झटणारे,एक कॉल-प्रॉब्लेम सॉल्व अशी इमेज असणारे व्यक्तिमत्त्व पाहिले जाते.पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बद्दल महाराष्ट्रातून सामाजिक,राजकीय तसेच इतर अनेक क्षेत्रातून कौतूकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

        कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT. LTD.

MUMBAI.

सर्व प्रकारच्या कार व जुनी 4 व्हीलर व 6 व्हीलर वाहने खरेदी करणारी ISO - 9001-2015 रजिस्टर कंपनी...


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.

कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________