सांगली कृष्णा नदीच्या पाण्याला भयंकर दुर्गंधी . प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके काय काम करते कळत नाही. .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली कृष्णा नदीच्या पाण्याला भयंकर दुर्गंधी . प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके काय काम करते कळत नाही. .



सांगली कृष्णा नदीच्या पाण्याला भयंकर दुर्गंधी येत आहे
सकाळी पोहायला जाणाऱ्या नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत
शेरीनाला तर आहेच ....मात्र वरून मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी सांगलीच्या नदी पात्रात मिसळत आहे...
फार मोठा विषय आहे..

प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके काय काम करते कळत नाही
मा मुख्यमंत्री कार्यालय
सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार दाखल केली आहे

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

कृष्णा नदी प्रदूषणा बाबत मुख्यमंत्र्यांच्या कडे निवेदन

प्रति,
मा.मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,मुंबई


विषय- सांगली मधील कृष्णा नदीपात्रात होणाऱ्या प्रदूषणाबाबतीत कायम स्वरूपी उपाय
योजना करणेबाबत.


महोदय,
 मागील काही वर्षांमध्ये सांगली मधुन वाहत जाणारी कृष्णा नदी खूपच प्रदुषित होत आहे. गेले कित्येक वर्ष सांगलीतील शेरीनाला हा नदी पात्रात मिसळत आहे याचे प्रदुषण होतच असताना नदी प्रदुषणाचे ठिकाण हे फक्त सांगली शेरीनाल्या पुरते मर्यादित न राहता नदीच्या उगम स्थानापासुन प्रदुषणाची पातळी वाढत आहे.गेल्या काही दिवसांपासुन रासायनिक पाणी नदी पात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीमधील मासे हि खुप मोठ्या प्रमाणात मरत आहेत. त्या पाण्यास भयंकर दुर्गंधी येत आहे.हेच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास खुप मोठ्या प्रमाणात धोका आहे व नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात याबाबत लवकरात लवकर उपाय योजना केल्या नाहीत तर ज्या पद्धतीने नदीतील मासे मरत आहेत त्याच पद्धतीने माणसे हि मरतील याची नोंद घेण्यात यावी.  याबाबतीत प्रदुषण नियंत्रण मंडळाकडुन कोणतीही कार्यवाही होताना दिसुन येत नाही.हा फार मोठा गंभीर विषय असुन हि प्रदुषण रोखण्याबाबतीत प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसुन येत नाही. 
      तरी आपण या नदी प्रदुषण विषयमध्ये लक्ष्य घालुन कायम स्वरुपी उपाय योजना करण्यासाठी संबधित विभागास योग्य ते आदेश देण्यात यावे तसेच यासाठी लागणार निधी हि उपलब्ध करून देण्यात यावा.      
                                                                          नागरीक जागृती मंच,सांगली 
                                                                             सतीश साखळकर

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.