SANGLI:एक तास राष्ट्रवादी साठी विचार मंथन बैठक संपन्न...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI:एक तास राष्ट्रवादी साठी विचार मंथन बैठक संपन्न...SANGLI:
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

एक तास राष्ट्रवादीसाठी विचार मंथन बैठक संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.

या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.


या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे एक तास राष्ट्रवादी बैठक       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज , राष्ट्रवादी युवकचे शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली .

           बैठकीत वाढत चाललेल्या महागाई बाबत निषेध व्यक्त करण्यात आला व प्रभागांतील नागरिकांच्या समस्या बाबत प्रत्येक प्रभागातील आढावा घेण्यात आला


         यावेळी राष्ट्रवादी चे कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे ,मा. नगरसेवक हरिदास पाटील , विष्णू माने, योगेंद्र थोरात ,अनिता पांगम , वंदना चंदनशिवे ,उत्तम कांबळे , ज्योती अदाटे ,युवराज गायकवाड ,महालिंग हेगडे ,विनायक हेगडे ,उमर गवंडी , निलेश शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.