हज यात्रेकरूंच्या फिटनेस दाखल्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा : हज कमिटी सदस्या नसीम शेख यांची सिव्हिल प्रशासनाकडे मागणी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

हज यात्रेकरूंच्या फिटनेस दाखल्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा : हज कमिटी सदस्या नसीम शेख यांची सिव्हिल प्रशासनाकडे मागणी
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सांगली

हज यात्रेकरूंच्या फिटनेस दाखल्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा : हज कमिटी सदस्या नसीम शेख यांची सिव्हिल प्रशासनाकडे मागणी

हज यात्रेकरूंसाठी फिटनेस कक्ष उभारून तेथूनच सर्व तपासण्या आणि सर्टिफिकेट देण्याची सोय करावी...

             हज कमिटी सदस्या नसीम शेख

. याबाबतचे पत्र इमरान शेख यांनी उपधिष्ठाता जोशी यांना दिले या पत्रात म्हंटले आहे की, हज यात्रा 2023 साठी सांगली जिल्ह्यातून 467 यात्रेकरू जाणार आहेत. यासाठी यात्रेकरूंना फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते. यासाठी विविध तपासण्या सिव्हिल हॉस्पिटल कडून केल्यानंतर यात्रेकरूंना फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. सध्या अनेक यात्रेकरू सिव्हिल मध्ये फिटनेस साठी येत आहेत मात्र काही विभाग सांगली तर काही विभाग मिरज सिव्हिल मध्ये असल्याने या यात्रेकरूना सांगली मिरज अशा फेऱ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे हज यात्रेकरूंची ही गैरसोय टाळण्यासाठी सांगली सिव्हिल फिटनेस हॉस्पिटल येथे स्वतंत्र हज यात्रेकरूंसाठी फिटनेस कक्ष उभारून तेथूनच सर्व तपासण्या आणि सर्टिफिकेट देण्याची सोय करावी असे म्हंटले आहे. यावेळी भाजपचे नेते इमरान शेख, हाज कमिटीचे हाजी अख्तर मुनीर अत्तार उपस्थित होते.

हज यात्रेकरूंच्या फिटनेस दाखल्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा : हज कमिटी सदस्या नसीम शेख यांची सिव्हिल प्रशासनाकडे मागणी

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.