गुंठेवारी खरेदी विक्री 12 जुलै 2021 पूर्वी प्रमाणे सरकारला सुरूच ठेवावी लागेल काल दि.१२ मे रोजी वरिष्ठ न्यायालयाने पुन्हा फेटाळली...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गुंठेवारी खरेदी विक्री 12 जुलै 2021 पूर्वी प्रमाणे सरकारला सुरूच ठेवावी लागेल काल दि.१२ मे रोजी वरिष्ठ न्यायालयाने पुन्हा फेटाळली...





गुंठेवारी खरेदी विक्री 12 जुलै 2021 पूर्वी प्रमाणे सरकारला सुरूच ठेवावी लागेल काल दि.१२ मे रोजी वरिष्ठ न्यायालयाने पुन्हा सरकारच्या थोबाडीत मारून स्थगिती याचिका फेटाळून गुंठेवारी जनतेच्या बाजूने निकाल दिला - गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण*

राज्य सरकारला औरंगाबाद खंड पिठाने मुद्रांक वा नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी 12 जुलै 2021 रोजी परिपत्रक काढून गुंठेवारी खरेदी विक्रीसाठी मनाई केली होती ती या न्यायालयाने फेटाळून लावली. यांनंतर राज्य सरकारने यावर पुनरवीचार याचिका दाखल केली ती न्यायालयाने फेटाळून लावली. या राज्य सरकारला ही प्रक्रिया सुरु करायची नाही या हेतूने त्यांनी वरिष्ठ न्यायालयात स्थगिती मिळावी यासाठी सरकारने अपील केले होते तिथेही सरकारच्या न्यायालयाने थोबाडीत मारून ही याचिका फेटाळून लावून गुंठेवारी जनतेच्या बाजूने निकाल देऊन राज्यातील गोरगरीब जनतेला न्याय दिला आहे.


शिवसेना गुंठेवारी विकास समिती ने या राज्यातील जनतेला न्याय मिळावा यासाठी आक्रमकपणे संघर्ष केला आहे.आता सरकारला पर्याय उरला नाही..

शिवसेना गुंठेवारी समितीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समक्ष निवेदन देऊन विनंती केली होती की, सरकारने गुंठेवारी खरेदी विक्री पूर्ववत सुरु करावी. सरकारला मोठा महसूल मिळणार आहे.. खरेदी विक्री करून घेणारा व्यक्ती हा बांधकाम परवानगी घेताना त्यांना बेकायदेशीर परवानगी सरकार देऊ शकत नाही. ज्या व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केले तर त्यास रेडी रेकनरच्या १० टक्के दंड लावला आहे. गुंठेवारी नागरिक बेकायदेशीर घरे बांधून कायदयाचे उल्लंघन करणार नाहीत असे समितीने म्हटले आहे.


आता सरकारला पर्याय उरला नाही. सरकारने यावर एक कमिटी नेमून नऊ अधिकारी यांची नेमणूक केली होती. त्यावर ही शिवसेना गुंठेवारी समितीने सदस्य सांगली जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन तीव्र कायदेशीर मुद्दे उपस्थित करून आक्षेप नोंदवाला होता. ही समिती ही आता निकाला मुळे बारळाली आहे.

आता राज्यातील गुंठेवारी खरेदी विक्री करून घेणाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने यांची तात्काळ अंमलबजावणी न केल्यास सरकारवर कारवाईचा बडगा न्यायालय उचलू शकते..


चंदनदादा चव्हाण : प्रदेशाध्यक्ष : शिवसेना गुंठेवारी विकास समिती, महाराष्ट्र राज्य( मा. उध्वव बाळासाहेब ठाकरे)*.
भ्रमनध्वनी:9421245003,दि.१३ मे २०२३.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली
_______________________________________________________


          या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली, रत्नागिरी व कोकण... 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील आंबा, काजू, काळी मिरी व इतर सर्व पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...


त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
      
संपूर्ण कोकण परिसरामध्ये आपल्या शेतजमिनी योग्य दरात खरेदी करणारी एकमेव कंपनी..
त्वरित संपर्क करा..   
             www.nisargbhumi.com

                   9850155823

                   8830247886

____________________________________________________________________________________