सातारा:वाईच्या पश्चिम भागातील वरखरवाडी मांढरेवाडी अभेपुरी गाडवेवाडी या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने घरांसह शेतजमीनींचे लाखो रुपयांचे नुकसान .....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा:वाईच्या पश्चिम भागातील वरखरवाडी मांढरेवाडी अभेपुरी गाडवेवाडी या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने घरांसह शेतजमीनींचे लाखो रुपयांचे नुकसान .....




बाजीराव नवघणे वासोळे

लोकसंदेश न्युज वाई प्रतिनिधी 
 
वाईच्या पश्चिम भागातील वरखरवाडी मांढरेवाडी अभेपुरी
गाडवेवाडी या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने घरांसह शेतजमीनींचे लाखो रुपयांचे नुकसान .


गेल्या दिड महिन्यापासून वाईचे तहसीलदार हे
पद रिक्त असल्याने अडचणी कोणाकडे मांडायच्या असा प्रश्न नागरिकांना पडला आहे .


वाईच्या पश्चिम भागातील मांढरेवाडी
अभेपुरी गाडवेवाडी वरखरवाडी या गावांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वेगवान वार्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने ओढे नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने थैमान घातल्याने ओढ्यावरील सौरक्षण भिंतीसह पुलाचे भराव आणी शेत जमीनी वाहुन गेल्या तर अनेक घरांन वरील कौले आणी पत्रे वाहुन गेल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .त्या मुळे येथील शेतकर्यांन मध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे .


घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी कि गेली कित्येक दिवसा पासून या गावांन मध्ये ऊष्णतेची लाट आल्या सारखी परस्थीती निर्माण झाल्याने ऊखाड्याने नागरीक हैराण झाले असतानाच आज सोमवार दि.२९ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पणे ढगाळ वातावरण निर्माण होवुन वेगाने वारे वाहू लागले आणी मेघ गर्जेनेसह
मुसळधार पावसाने सुरवात केली .


त्यात ओढ्या नाल्यांना पुर आले आणी अनेक घरां वरील पत्रे कौले तर काही ठिकाणी पत्र्याचे शेड वेगवान वार्यामुळे ऊडुन गेल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे .जांभळीचा माळ येथील हणमंत बाबुराव भेलके या शेतकर्याचे अंदाजे एक एकर शेत जमीनीचे मातीसह क्षेत्र वाहुन गेल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .शरद दत्तात्रय गाडवे आनंदराव रामचंद्र गाडवे या दोन्ही शेतकर्याचे पत्र्यांचे शेड ऊडुन गेले आहेत. वामन चिकणे या शेतकर्याच्या घरावरील कौले ऊडुन गेली आहेत .



गाडवेवाडी गावच्या जोवंदरा ओढ्याला आलेल्या महापूरा मुळे
गावच्या पुलात महापूराचे पाणी न बसल्याने पाण्याच्या रेट्याने सौरक्षणा भिंतीसह पुलाखालील भराव वाहुन गेल्याने त्या वरील वाहतूक धोकादायक बनली आहे .
हा पुल कुठल्याही क्षणी जमीनदोस्त
होवुन येणार्या जाणार्यांचे मुडदे पडतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी.असे आवाहन संतप्त झालेल्या नागरिकांनी केले आहे .

लोकसंदेश न्युज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई