राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र दिन साजरा..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे आज सकाळी १० वाजुन १० मिनिटाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या
*पुरोगामी,प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. पुरोगामित्वाचा हा वारसा जपत धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी कटिबद्ध राहूया.सर्वधर्म समभाव हे सूत्र अंगीकारून महाराष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रदिनानिमित्त करूया असे मा. राहुल पवार म्हणाले*
यावेळी राष्ट्रवादी सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके , मा . नगरसेवक हरिदास पाटील,असिफ बावा , आयुब बारगिर , अनिता पांगम, डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे, फिरोज मुल्ला,प्रकाश सुर्यवंशी , डॉ सतीश नाईक ,अर्जुन कांबळे ,सुरेखा सातपुते ,संगीता जाधव ,कुमार वायदंडे , दत्ता पाटील ,जुबेर मुजावर , इर्शाद पखाली ,सुभाष तोडकर , अरूण चव्हाण ,मनोज हेगडे ,राहुल यमगर , आदर्श कांबळे , सुमित कुंभोजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली