Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा:आनेवाडी टोलनाका परिसरात पिस्टल विक्री करणाऱ्या तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सातारा

सातारा:आनेवाडी टोलनाका परिसरात पिस्टल विक्री करणाऱ्या तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

पुणे -बंगलोर राष्ट्रीय महा मार्गावरील आनेवाडी टोल नाका परिसरातील विरमाडे गावच्या हद्दीतील हॉटेल महाराजा समोर बेकायदेशीर पिस्टलची विक्री होत असल्याच्या खात्रीपूर्वक माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करून तीन जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून पाच पिस्टल आणि जिवंत काडतुसे असा सुमारे 3 लाख 27 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.


मिळालेली माहिती अशी की, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्रे विक्री करणाऱ्यांवर पाळत ठेवून आहे. देवकर यांना खास खबऱ्याकडून माहिती मिळाली की वाई तालुक्यातील विरमाडे येथे पिस्टल विक्रीला काही लोक येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.13रोजी सापळा रचला त्यावेळी हॉटेल महाराजा समोर पिस्टल विक्री करण्यासाठी आलेला महेंद्र प्रकाश पावरा (वय 22, रा.उमटी जि. जळगाव), व त्याच्याकडून विकत घेणारे वैभव बाळासो वाघमोडे(वय 21, रा.बलगवडे जि. सांगली), अशोक विठ्ठल कार्वे(वय 58 रा, येरवळे ता.कराड) यांच्याकडून 5 देशी बनावटीची पिस्टल, 10 जिवंत काडतुसे असा सुमारे 3 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला असून तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे हे तपास करत आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.