जळगांव:पाचोरा येथील खाजगी रूग्णालयांमध्ये डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन मार्फत जागतिक परिचारिका दिवस साजरा.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जळगांव:पाचोरा येथील खाजगी रूग्णालयांमध्ये डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन मार्फत जागतिक परिचारिका दिवस साजरा.




जळगांव:पाचोरा येथील खाजगी रूग्णालयांमध्ये डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन मार्फत जागतिक परिचारिका दिवस साजरा.
                                                                       .                 लोकसंदेश जळगांव जिल्हा प्रतिनिधी   (पाचोरा)  शेख जावीद

 पाचोरा येथील १२ मे जागतिक परिचारिका दिन म्हणून पाचोरा येथील खाजगी रूग्णालयांमध्ये डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन व साईनाथ सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व प्रथम ज्या परिचारिकेंच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो त्या फ्लॉरेंन्सं नांईंटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन, दिपप्रज्वलन, व माल्यार्पण उपस्थित डॉ.व परिचारिकांच्या हस्ते करण्यात आले. 


पाचोरा मधील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अंकुर हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, सिटी केअर हॉस्पिटल, दुर्वांकुंर नवजात बाळांचे हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, श्रीकृष्ण प्रसूतीगॄह व ॲक्सिंडेंट ट्रामा हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल या हॉस्पिटल मधील सर्व परिचारिका (सिस्टर) व डॉक्टर्स लोकांचा वाचनालय व फॉऊंडेंशन मार्फत डॉ. यशवंत पाटील यांनी मिठाई, बिस्कीट, चॉकलेट व बुके देवून स्वागत केलेकोरोना काळ असेल किंवा ईतर वेळी, दिवस रात्र असेल आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व परिचारीका आपल्या रूग्णांची काळजी व्यवस्थितपणे घेतात. व रुग्णांच्या सेवेमध्ये अहोरात्र झटतात, त्यांच्या सेवावृत्तीला खरोखर नमन आहे.यावेळी उपस्थित परिचारिकांना परिचारिका दिनाचे महत्त्व समजावून सांगताना डॉ. यशवंत पाटील म्हणाले की १२ मे हा एक जागतिक परिचारिका दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. इ. स. १८५४ साली झालेल्या क्रिमीयन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारि आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेंन्सं नांईंटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म १२ मे १८२० मध्ये फ्लोंरेंन्सं इटली येथे झाला. रेड क्रॉस चे संस्थापक हेन्री डयुंनंट यांनी त्यांना ''लेडी विथ द लॅम्प " ही उपाधी दिली. अतिशय सुखी कुटुंबात जन्मलेल्या फ्लॉरेंन्सं नांईंटिंगेल म्हणत की परमेश्वराने आपल्याला भूतदया व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले आहे अशा भावनेनेच त्या प्रेरीत झाल्या होत्या.फ्लॉरेंन्सं नांईंटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्रांची संस्थापिका समजले जाते. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टीकोनातून रुग्णसेवा केल्यामुळे परिचर्या शास्त्राला नवी दिशा प्राप्त झाली. म्हणून त्यांच्या सन्मांन प्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्या" दिन म्हणून साजरा केला जातो. असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमास, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. वैभव सुर्यवंशी, डॉ. पवन पाटील, डॉ. अनुजा देशमुख, डॉ. सचिन वाघ, डॉ. मुकेश तेली, डॉ. अभिषेक जगताप, डॉ. तौसिफ खाटीक, डॉ. विजय पवार, व परिचारिका  छाया पाटील, पुष्पा बडगुजर, उषा मोरे, मनिषा कदम, शकुंतला पवार, श्रध्दा परदेशी, जागृती सिस्टर, संगिता मावशी, अलका मावशी, शोभा डागोर, प्रतिक्षा सिस्टर, गायत्री महाजन, दर्शना पवार, पूनम कोळी, दीपाली देवरे, प्रतिक्षा थूल, प्रियंका बागुल, विनंती बागुल, सुनिता पाटील, अनिता निकम, साक्षी लोहार, मुमताज शहा, शिंपी मावशी, नौशाद शहा, जया गोसावी, खुशी हुजरे, दिपाली गायकवाड, मुस्कान पठाण, नेहा पिंपळे, सीमा खैरनार, लता मोरे, ईला भास्कर, प्रतिक्षा राठोड,निशा चव्हाण, संगिता सिस्टर,पूजा सिस्टर, वैजयंता मावशी, ब्रदर अक्षय पाटील, कृष्णा चव्हाण, नितीन मापारी, जयपाल सोळंके, अरविंद राठोड, अमित मोरे, रामा राउत, हिरा भोई, रावसाहेब पाटील, इ. उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मिडीयम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.