लोकसंदेश न्यूज नेटवर्क
गुरुवारपासून कुपवाड येथील नव महाराष्ट्र स्कूलच्या ग्राउंड वर सुरू होत असणाऱ्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयोजित राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धा अवकाळी पावसामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
गुरुवारी पावसामुळे स्पर्धा रद्द करून त्या शुक्रवार सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहेत अशी माहिती उपआयुक्त स्मृती पाटील यानी दिली.
गुरुवारपासून नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या ग्राउंड वर राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कबड्डी स्पर्धेसाठी ची सर्व तयारी महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली होती यासाठी चार क्रीडांगण ही सज्ज करण्यात आली होती मात्र गुरुवारी सायंकाळी उद्घाटनाच्या वेळेतच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कबड्डी स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली मैदान भिजल्यामुळे त्या ठिकाणी स्पर्धा खेळणे अशक्य झाल्याने गुरुवारी होणाऱ्या सर्व स्पर्धा या शुक्रवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता या स्पर्धा सुरू होणार असून स्थानिक संघांना यासाठी निमंत्रण देण्यात आलेला आहे सुरुवातीला सांगली आणि कोल्हापुर येथील स्थानिक संघटना या ठिकाणी स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाणार असून सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कबड्डी स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन केले जाणार आहे त्यामुळे आज गुरुवारी होणारे सामने रद्द करण्यात आले असून आज शुक्रवारपासून नियमितपणे कबड्डी सामने सुरू होणार आहेत
अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेवक विजय घाडगे, नगरसेविका कल्पना कोळेकर , सहाय्यक आयुक्त नितीन काका शिंदे , सहायक अशोक कुंभार, नगर सचिव चंद्रकांत आडके, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्यासह या स्पर्धेसाठी नियुक्त केलेल्या संयोजन समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून नवभारत हायस्कूलच्या क्रीडांगणावर निमितपणे कबड्डी स्पर्धांना सुरुवात होणार असून सर्व क्रीडा रसिकांनी या स्पर्धांचा लाभ घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने स्थानिक संघाने सकाळी साडेआठपूर्वी या स्पर्धा परीक्षांमध्ये आपली उपस्थिती लावायची आहे असे आवाहन क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनीही स्पर्धा परिसराला भेट देऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई