आम्ही सांगलीकर : हिंदू - मुस्लिम व सर्व धर्मीय ऐक्य परंपरा मजबूत करण्यासाठी भव्य दिव्य मानवी साखळी आयोजित करणार. - पृथ्वीराज पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आम्ही सांगलीकर : हिंदू - मुस्लिम व सर्व धर्मीय ऐक्य परंपरा मजबूत करण्यासाठी भव्य दिव्य मानवी साखळी आयोजित करणार. - पृथ्वीराज पाटील




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

आम्ही सांगलीकर : हिंदू - मुस्लिम व सर्व धर्मीय ऐक्य परंपरा मजबूत करण्यासाठी भव्य दिव्य मानवी साखळी आयोजित करणार.
--पृथ्वीराज पाटील

सांगली दि. ११:सांगलीत सामाजिक सलोखा व शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही सांगलीकर लोकराजा छ. शाहू महाराजांच्या जयंतीदिनी दि. २६जून रोजी सांगलीत हिंदू - मुस्लिम व सर्व धर्मीय जनतेत ऐक्य भावना मजबूत करण्यासाठी हजारो सांगलीकरांची मानवी साखळी आयोजित करणार आहे. आम्ही सांगलीकर एक आहोत.. शहरात दंगलीला स्थान असणार नाही. दंगलीमध्ये सामान्य माणूस भरडला जातो. आम्हाला सांगली सुरक्षित ठेवायची आहे. जाती पातीपेक्षा जनतेची भाकरी आणि सुरक्षितता महत्वाची आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. आज मराठा सेवा संघ सांस्कृतिक सभागृहात आयोजित सामाजिक शांतता व सलोखा बैठकीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, सांगलीत सामाजिक शांतता व सलोखा निर्माण करण्यासाठी माझा पुढाकार असेल.सांगली मिरजेत हिंदू मुस्लीम समाज कायम एकमेकांच्या सणात सहभागी होत असतो. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व धर्मीय लोकांना समंजसपणाने संयम राखून सहकार्य करावे. शहरातील प्रत्येक वार्डात प्रभागात प्रबोधन मोहिम सुरू करणार आहे. बंधुभाव वृध्दीगंत करण्यासाठी माझे प्राधान्य राहील.आम्ही सांगलीकर ही आता सांगलीत सामाजिक सलोखा व शांतता मजबूत करण्यासाठी लोक चळवळ होत आहे.




प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रास्ताविकात प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी बैठकीची पार्श्वभूमी विशद केली .

यावेळी मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बावा म्हणाले, 'सांगलीत सामाजिक सलोखा व शांतता वृध्दीगंत करण्यासाठी सर्वांनी सामुदायिक सहकार्य करावे. आपापला भाग सांभाळा, सर्व धर्मीय ५० लोकांची सामाजिक सलोखा कृती समिती स्थापन करून नियंत्रण व मार्गदर्शन करावे. सोशल मिडियावर सामाजिक सलोखा व शांतता या विषयावर लिहा.. बोला समाजातील प्रतिष्ठीत लोकांनी तरुण पिढीचे प्रबोधन करावे. चुकीचे समर्थन कोणीही करु नये. '


सांगलीत सामाजिक सलोखा व शांतता वृध्दीगंत करण्यासाठी या बैठकीत आसिफ बावा, नितीन चव्हाण, नंदकुमार हत्तीकर, शाहीन शेख, आशिष कोरी, प्रा. रविंद्र शिंदे, मयूर पाटील, फारुख गवंडी, अभिजित भोसले, शिवाजी त्रिमुखे, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, आकाश तिवडे,किरणराज कांबळे,उत्तम कांबळे, शंभोराज काटकर,मयूर पाटील, करीमभाई मिस्त्री, देवानंद जमगी यांनी सामाजिक सलोखा या विषयावर मनोगते व्यक्त केली.


यावेळी शिवलिंग हेगडे, अमित शिंदे वकील, चंदन चव्हाण, बिपीन कदम, रवी खराडे, हरिदास पाटील, फिरोज पठाण,लालू मिस्त्री, आयुब बारगीर, रज्जाक नाईक, अमन पठाण, युनुस महात, सलिम नदाफ व सर्व धर्मीय समाजनेते व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुरक्षित, शांत व निर्भय सांगली बनवण्यासाठी आजच्या बैठकीला सांगलीच्या इतिहासात महत्वाचे स्थान असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई