सातारा:मांढरदेव येथील तरुणांनी शिवराज्याभिषेक दिन अनोख्या पद्धतीने केला साजरा .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा:मांढरदेव येथील तरुणांनी शिवराज्याभिषेक दिन अनोख्या पद्धतीने केला साजरा .



लोकसंदेश न्युज सातारा प्रमुख
 दौलतराव पिसाळ

मांढरदेव येथील तरुणांनी शिवराज्याभिषेक दिन अनोख्या पद्धतीने केला साजरा .


मांढरदेवी येथील युवकांनी शिवराज्याभिषेक दिनाचे तसेच काळेश्वरी सेवा प्रतिष्ठानचे सदस्य मंगेश मांढरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून. मांढरदेवी काळुबाई मंदिर परिसरातील संपूर्ण स्वच्छता केली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या काळुबाई देवीस. राज्यातून तसेच पर राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी मांढरदेवला येत असतात. नवसाला पावणारा देवी असल्यामुळे येताना ज्या भाविकांच्या मनोकामना,नवस पूर्ण झालेले असतात.असे भाविक देवीला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच बकरी कोंबड्याचा नैवेद्य करत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो.



 परिसरातील त्या सर्व कचऱ्याची साफ-सफाई करून एका वेगळ्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा संकल्प गावातील युवक मुलांनी केला.आणि या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे नियोजन गणेश बोबडे आणि परशुराम मांढरे यांच्याकडून केले गेले. त्यांना काळेश्वरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाथा मांढरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कामासाठी काळेश्वरी सेवा प्रतिष्ठानचे सदस्य यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


त्यामध्ये शेखर मांढरे,श्रीकांत मांढरे,सुनिल मांढरे,विशाल मांढरे,अक्षय कळंबे,तेजस मांढरे,सोमनाथ भानसे, प्रवीण मांढरे,अमर मांढरे,पांडुरंग मांढरे,निलेश मांढरे,राजू शिंदे,सचिन मांढरे,अमित मांढरे,अभी मांढरे, आश्विन मांढरे,योगेश जाधव,सूयोग जाधव,पंकज कळंबे,चंदू मोरे,अजित मांढरे,अशा अनेक युवकांनी योगदान दिले.त्यामध्ये शंतनु मांढरे या आठ वर्षाच्या चिमुकल्यांने सुध्दा मोठी मदत केली.


या सर्वांना चहा,आईस्क्रीम आणि नाष्ट्यची सोय प्रविण पाटिल, तसेच विशाल मांढरे यांच्या कडून केली गेली.हे काम करत असताना भाविकांकडून समाधान व्यक्त केले गेले. परिसरात असलेले टॉयलेट बाथरूम मध्ये पाण्याच्या अभावामुळे अतिशय दुर्गंधी आणि घाण झालेली होती.त्याची साफ-सफाई ट्रस्टकडून ठेवली गेली तर त्याचा सुद्धा वापर भाविकांना करता येईल अशी आशा भाविकांन कडून व्यक्त करण्यात आली.या सफाई कामासाठी मांढरदेव येथील ज्या ज्या युवकांनी योगदान दिले त्या सर्वांचे मांढरदेव ग्रामस्थ व काळेश्वरी सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून कौतुक करून आभार मानण्यात आले. आणि इथून पुढे गावातील युवकाचा वाढदिवस असेल.तर त्याचा वाढदिवस अशा पद्धतीने गावातील मंदिर परिसरातील साफसफाई करून साजरा करणार असल्याचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष नाथा मांढरे यांच्याकडून सांगण्यात आले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई