महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटने मार्फत महानगरपालिकां मधील अधिकारी-कर्मचाऱ्यां
साठी नागरी साहित्य लेखन स्पर्धा-२०२३ आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नागरी भागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या साहित्यिक लेखनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने (महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकारी संघटना) नागरी साहित्य लेखन स्पर्धा-२०२३ घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी घेऊ इच्छिणाऱ्यांनी २० सप्टेंबर २०२३ पूर्वी महापालिका अधिकरी / कर्मचारी यांनी आपले लेख,कथा, कविता पाठवावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासन संचालक तथा आयुक्त मनोज रानडे यांनी केले आहे.
नागरीकरण वेगाने होत असताना ग्रामीण भागातून शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. अशा सुमारे ५५% लोकसंख्या असलेल्या नागरी भागातील साहित्यिक वारसा देखील तेवढाच समृध्द व्हावा, नागरी भागातील कला, संस्कृती, साहित्य यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने व अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यातील साहित्यिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेमार्फत नागरी साहित्य लेखन स्पर्धा-२०२३ आयोजित करण्यात आलेले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पर्धेबाबत संघटनेमार्फत अनोखा व नाविन्यपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे.
सांगली नाट्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहेच , सांगली ,मिरज आणि कुपवाड या शहरा बरोबर सांगली जिल्हास नवलौकीक मिळवून देणारे असे अनेक प्रतिभावान लेखक, कवी, साहित्यिक देखील लाभले आहेत ,
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना सादर करण्यासाठी व्यसपीठं उपलब्धता होत असल्याने अधिकारी कर्मचारी यांनी जास्तीत जास्त आपले लिखान, साहित्य प्रकारत आपला स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवावा असे आवाहन *प्रशासक तथा आयुक्त श्री सुनील पवार* यांनी या व्दारे केले आहे.
स्पर्धेच्या नियम व अटीचे पालन करून आपले लिखाण साहित्य वेळेत खाली नमूद केलेल्या व्हॉटस्अपवर किंवाई-मेलवर दिलेल्या २०सप्टेंबर मुदतीपर्यंत पाठवाव्यात यावे असे आवाहन देखील केले आहे,
*स्पर्धेत सहभाग कसे व्हावे*
वरील स्पर्धा गटातील सहभागी साहित्यिकांनी आपले साहित्य लेखन श्रीम. फाटक (भ्रमणध्वनी क्रमांक- 9823013692 या व्हॉटस्अपवर किंवा dmabestpractices@gmail.com या ई-मेलवर (युनिकोड फॉन्टमध्ये) दिलेल्या मुदतीपर्यंत पाठवाव्यात. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, (संपर्क क्रमांक ९४०४२४२८२३), श्रीम. प्राची साळवी, संगणक अभियंता, न.प.प्र.सं. (संपर्क क्रमांक ९५७९१९५०५९) यांच्याशी संपर्क करावा.
*आगामी अंमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात* नगरपालिका, बरोबर *महापालिकेच्या उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत,*
संमेलनाच्या आदल्या दिवशी ग्रंथ दिंडीमध्ये महाराष्ट्रातील नगरपालिका / नगरपंचायती आणि महानगरपालिका सहभागी होतील.
साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी अशा नगरपालिकांसाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात येईल. ज्या नगरपालिकांच्या वाचनालयांचा / ग्रंथालयांचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव झाला असेल अशा या नगरपालिका व महापालिका साहित्य संमेलनाच्या दिवशी जे प्रदर्शन असेल तिथे आपली माहिती प्रदर्शित करतील.
नगरपालिकांच्या व महापालिकाच्या ज्या वाचनालयांचा / ग्रंथालयांचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव झालेला आहे त्यांचे पुस्तक संपादित करुन प्रकाशित करण्यात येणार आहे.
नगरपालिका बरोबर *महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी नागरी साहित्य लेखन स्पर्धा- २०२३* व *अंमळनेर येथील होणाऱ्या साहित्य संमेलनात स* हभाग घ्यावा, असेही आवाहन मुख्याधिकारी संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख, सचिव डॉ. प्रशांत रसाळ व कोषाध्यक्ष जमीर लेंगरेकर व सहकोषाध्यक्ष धैर्यशील जाधव यांनी केले आहे.
डी. व्ही .हर्षद
जन माहिती अधिकारी
माहिती जन संपर्क विभाग ,मनपा
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.