कर्मवीर आण्णांच्या जयंती निमित्त सांगली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सांगली :- :- रावसाहेब जिनगोंडा पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कर्मवीर आण्णांच्या जयंती निमित्त सांगली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सांगली :- :- रावसाहेब जिनगोंडा पाटील




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

कर्मवीर आण्णांच्या जयंती निमित्त सांगली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली :-

:- रावसाहेब जिनगोंडा पाटील..


कर्मवीर आण्णांची जयंती कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट या दोन संस्थांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते. यावर्षी सुद्धा दिनांक २२ सप्टेबर २०२३ रोजी संपुर्ण दिवसभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने कर्मवीर जयंती साजरी करणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी प्रतिनिधींना दिली.


दिनांक २२ सप्टेबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता मुख्य कार्यालय कोल्हापूर रोड, सांगली येथे कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन होईल. त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर होणार आहे. दुपारी ३ वाजता भावे नाट्यमंदिर सांगली येथे व्याख्याते आणि दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक श्री. संजय आवटे यांचे "भारताचा वारसा आणि आजचा आरसा " या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी मुकबधीर शाळेस वस्तु भेट देणे व अपंग व्यक्तीना मदतीचा चेक वितरण करणेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमास सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त श्री सुनिल पवार हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत.



संस्थेने आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सतत भरीव योगदान दिले आहे. विविध कार्यासाठी

कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण विद्याथ्यांचा व गुणिजनांचा सत्कार रक्तदान शिवीर हे कार्यक्रम संस्था राबविते आहे.


विद्यार्थी, खेळाडू. अनाथाश्रम वृध्दाश्रम यांना मदत अपंग पुनर्वसन व वृक्षारोपन व्याख्यांनाचे आयोजन यासाठी संस्थेने

मोठे काम केले आहे. प्रत्येक नैसर्गिक आपत्ती वेळी कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट ने सढळ हाताने मदत

केली आहे.



संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हा असून विश्वासार्ह व नावाजलेल्या संस्थेमध्ये या संस्थेची गणना होते. संस्थेच्या एकूण ठेवी ९२८ कोटी आहेत. संस्थेने रु ७१८ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे वसुल भांडवल ३० कोटी ४५ लाख असून संस्थेचा स्वनिधी रु. ९१ कोटी २० लाख इतका आहे. संस्था भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे. ६ सभासदांच्या हितासाठी संस्थेने ठेवी कर्जाच्या विविध योजना राबविल्या आहेत. सामाजिक आर्थिक क्षेत्रात चांगल्या कार्याबद्दल संस्थेला सतरा वेळा आदर्श पतसंस्था म्हणुन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


संस्था सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ६० शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे. सर्व शाखा ऑनलाईन कोअर बँकींग ने जोडलेल्या आहेत. संस्थेत SMS बँकींग RTGS/NEFT / IMPS व लॉकर सुविधा इ. सुविधा देण्यात येत आहेत. संस्थेच्या १३ शाखा स्वमालकीच्या सुसज्य वास्तुत कार्यरत आहेत. आर्थिक क्षेत्रात एक विश्वासार्ह व नावाजलेली संस्था म्हणून कर्मवीर संस्था अग्रक्रमाने काम करीत आहे. कोल्हापूर रोड सांगली येथे संस्थेचे सर्व सोईनियुक्त मुख्यालय आहे.

यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष व संचालक श्री. ओ. के. चौगुले (नाना) कार्यवाह व तज्ञ संचालक श्री. लालासो भाऊसो थोटे संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे. संचालक अॅड. एस. पी. मगदुम डॉ. रमेश वसंतराव ढबू. श्री. वसंतराव घुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासो पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम आदी उपस्थित होते...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.