प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा - मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर सावळीत महिला किसान दिनानिमित्त महिला मेळाव्यात आवाहन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा - मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर सावळीत महिला किसान दिनानिमित्त महिला मेळाव्यात आवाहन



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा
- मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर 
सावळीत महिला किसान दिनानिमित्त महिला मेळाव्यात आवाहन

सांगली, दि. 19 : केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना असून, ती एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP-One District One Product) या आधारावर राबविली जात आहे. यातून सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता रक्कम रूपये एक लाख ते एक कोटीपर्यंत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येते. तरी जास्तीत जास्त लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर यांनी केले. 



कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम अंतर्गत सावळी (ता. मिरज) येथे महिला किसान दिन निमित्त घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सरपंचा सन्मति गणे, मंडळ कृषि अधिकारी सागर कांबळे, कृषि पर्यवेक्षक ए. एम. पवार, जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) श्रीधर खोत, यशस्वी लाभार्थी छाया शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी श्री. निंबाळकर यांनी केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती व योजनेतंर्गत प्रकल्प तयार करताना घ्यावयाची काळजी, भांडवल उभारणी, प्रकल्प चालवणे व  वार्षिक नफा तोटा  यांचा ताळमेळ कसा घालावा याविषयी मार्गदर्शन केले.
कृषि सहाय्यक शशिकांत सूर्यवंशी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये समाविष्ट कृषि प्रक्रिया उद्योग व आवश्यक पात्रता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेच्या यशस्वी लाभार्थी छाया  शिंदे (गाव बुधगाव) यांनी त्यांच्या कृषि प्रक्रिया प्रकल्पांबाबत माहिती देऊन उपस्थित महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी होऊन स्वतःची प्रगती साधावी, असे सांगितले. जिल्हा संसाधन व्यक्तीश्रीधर खोत यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रकल्प ऑनलाईन कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा व महिला बचत गटांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मंडळ कृषि अधिकारी सागर कांबळे यांनी केले. आभार कृषि पर्यवेक्षक ए. एम. पवार यांनी मानले. यावेळी कृषि सहाय्यक विशाल सूर्यवंशी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव यादव, महिला बचत गट सदस्या आदि उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली .