प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज ‌‘आचार्यत्व पदारोहण' शताद्बीवर्षाचा शुभारंभ.. दक्षिण भारत जैन सभेतर्फे शताद्बी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज ‌‘आचार्यत्व पदारोहण' शताद्बीवर्षाचा शुभारंभ.. दक्षिण भारत जैन सभेतर्फे शताद्बी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन...



प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज ‌‘आचार्यत्व पदारोहण' शताद्बीवर्षाचा शुभारंभ..

दक्षिण भारत जैन सभेतर्फे शताद्बी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन...

सांगली (दि.25 ऑक्टोबर) : 20 व्या शतकातील प्रथम आचार्य प.पू.108 आचार्यश्री शांतिसागरजी महाराज यांचा ‌‘आचार्यरत्व पदारोहण' शताद्बी वर्षाचा शुभारंभ आज मुनिश्रींचे प्रतिमापूजन करून करण्यात आले. आचार्यश्रींनी खंडित झालेल्या दिगंबर मुनि परंपरेला ऊर्जितावस्था देवून खरा धर्म समजावून सांगितला. मुनिश्रींच्यामुळेच सन 1920 पासून निर्दोष मुनिपरंपरेचे पुनरूज्जीवन आणि आचार्य परंपराही सन 1924 पासून पुर्नस्थापित झाली. याचा शुभारंभ दि.25 ऑक्टोबर 2023 पासून शुभारंभ होतो आहे. 
द.भा.जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चित्रपट निर्माते राजु पाटील आणि इतर मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील, मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.  द.भा.जैन सभेच्या शेठ रा.ध.दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमधील लक्ष्मी जिनगोंडा पाटील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमानंतर आचार्यश्रींच्या जीवनावर उगारचे श्री. राजू पाटील निर्मित ‌‘चारित्र चक्रवर्ती' हा चित्रपट उपस्थितांना दाखविण्यात आला.


यावेळी डॉ. अजित पाटील यांनी आचार्यश्रींच्या आचार्यरत्व पदासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. सभा आणि सभेच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध शाखांमध्ये आजच्या दिनी आचार्यश्रींच्या प्रतिमेचे पूजनाने या आचार्यत्व पदारोहण शताद्बी वर्षाचा शुभारंभ होत असल्याचे सांगितले. मुनिश्री शांतिसागर महाराज यांच्या जीवनावरील ‌‘धर्मसाम्राज्यनायक आचार्यश्री शांतिसागर महाराज' बृहत्‌‍ग्रंथाचे लेखक डॉ.सी.एन.चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

चेअरमन श्री. रावसाहेब पाटील म्हणाले, मुनिश्रींच्या आचार्य पदारोहण शताद्बीवर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी प्रचार-प्रसार व्हावा यासाठी दक्षिण भारत जैन सभा व तिच्या शाखांच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. उगार येथील श्री. राजू पाटील यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक मुनिश्रींच्या जीवनावर चित्रपट बनविला असून या चित्रपटामध्ये काही त्रुटी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी श्री. राजू पाटील यांना द.भा.जैन सभा सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे सांगितले. समाजातील सर्वांनी हा चित्रपट नक्की पहावा असे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी श्री. राजू पाटील यांचा दक्षिण भारत जैन सभेतर्फे सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास सर्वश्री शांतिनाथ नंदगावे, एन.जे.पाटील, महावीर आडमुठे, प्रा.आप्पा भगाटे, प्रा.आप्पासोा मासुले, प्रा.एस.डी.आकोळे, प्रा. एन.डी.बिरनाळे, भूपाल मगदूम, प्रा.भूपाल शेंडगे, राजेश पाटील, भाऊसोा पाटील, दिपक पाटील, अनिता पाटील,  कमल मिणचे, रेखा पोचोरे, मंगल चव्हाण सौ. अनिता पाटील, यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.