लोकसंदेश न्यूज नेटवर्क
भाजपचे जेष्ठ नेते मा. आ. दिनकर (तात्या) पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी च्या श्री शैलेश (भाऊ) पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात आले. यावेळी श्री शैलेश भाऊ पवार हे नेतृत्वापेक्षा कर्तुत्वाने श्रेष्ठ आहेत असे उद्गगार उद्घाटन प्रसंगी दिनकर (तात्या) पाटील यांनी काढले. यावेळी उद्योजक सिद्धार्थ गाडगीळ हे ही उपस्थित होते. त्यांनी शैलेश (भाऊ) पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य अद्यावत वाचनालय प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांसाठी लवकरच होईल असे मत व्यक्त केले.
मराठा समाजाचे अध्यक्ष श्री अभिजीत (दादा) पाटील यांनी शैलेश (भाऊ) पवार यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. शैलेश (भाऊ) पवार यांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून अनेक दिवसाचा अनुभव अनेक नेत्यांच्या उपयोगी आला. शैलेश (भाऊ) पवार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभागाचा कायापालट करण्यात येईल. असे ही मत सिद्धार्थ गाडगीळ यांनी व्यक्त केले.
शैलेश (भाऊ) पवार एक प्रामाणिक कार्यकर्ते असून प्रभागातील समस्यांबाबत प्रामाणिकपणाने सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. सामाजिक कार्य करत असताना ते कोणत्याही अपेक्षा न ठेवता नागरिकांच्या महिलांच्या अडचणीला धावून जातात. तरुण युवक तरुणींसाठी प्रभागात भविष्यात संस्कार मय शिबिर राबवण्यात येणार आहे. शैलेश (भाऊ) पवार प्रभागाचा कायापालट लवकरच करतील
अशी आशा सर्वांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. शैलेश भाऊंच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहा असे आव्हान सर्व नेत्यांनी व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी श्री बाळासाहेब पाटील; सुहास कुलकर्णी; श्री पंडित पाटील; संदीप लेंगले; श्री लखन सूर्यवंशी; श्री सुनील पवार; आणि अनेक मान्यवर व प्रभागातील नागरिक तरुण युवक; पैलवान ग्रुप. मोठ्या संख्येने उपस्थित होते...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.