--पृथ्वीराज पाटील..
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली दि. १३ : कावजी खोतवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत हनुमान ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह सातपैकी पाच सदस्य निवडून आणून एक हाती सत्ता प्रस्थापित केली. आज नवनिर्वाचित सर्व सदस्य सांगलीत मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सौ. स्नेहा कांबळे, सदस्य संदीप शिरतोडे, रुपाली ऐवळे, योगेश पाटील, अलका भोसले व शुभांगी पाटील
या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा फेटे बांधून सत्कार केला.
यावेळी पृथ्वीराज म्हणाले, 'ग्रामपंचायत ही जनतेच्या विकासाची पायाभूत आधारशीला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीच्या रक्षणात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. यामध्ये ग्रामपंचायत ही केंद्रस्थानी आहे. त्यामुळे जनतेला आरोग्य, शिक्षण,रस्ते, वीज, नागरी सुविधा पुरवून कावजी खोतवाडीचा सर्वांगीण विकास करा.. माझे गावच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य राहील.'
या निवडणुकीत माजी सरपंच संजय सुर्यवंशी, श्रीकांत पाटील, माणिक कालेकर, जगन्नाथ शिंदे, अर्जुन कदम, विठ्ठल मुळीक, मारुती संभू पाटील, रामचंद्र पाटील यांनी पॅनेलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
यावेळी उमेश कांबळे, मोहन भोसले, हरी पाटील, उत्तम कालेकर, भास्कर मुळीक, उदय मुळीक, राजू माने, रोहीत भोसले, सागर भोसले, मल्हार हिप्परकर व सचिन पाटील व यशोधनचे प्रा. एन.डी.बिरनाळे आणि ओबीसी सेलचे अशोकसिंग रजपूत, आयुब निशाणदार, राजेंद्र कांबळे उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.