गौरीशंकर कॉलेजचे समोरील रोडवर डीजे वर पिस्टल व तलवारी हातात घेऊन नाचवणा-या आरोपींच्या वाई तपासपथकाने आवळल्या मुसक्या...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गौरीशंकर कॉलेजचे समोरील रोडवर डीजे वर पिस्टल व तलवारी हातात घेऊन नाचवणा-या आरोपींच्या वाई तपासपथकाने आवळल्या मुसक्या...


सातारा जिल्हा प्रमुख ओंकार पोतदार

गौरीशंकर कॉलेजचे समोरील रोडवर डीजे वर पिस्टल व तलवारी हातात घेऊन नाचवणा-या आरोपींच्या वाई तपासपथकाने आवळल्या मुसक्या...


..
वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना संशयित इसम हे पारगांव ता खंडाळा जि सातारा येथे वास्तव्यास आहेत अशी माहिती मिळाली.  वाई तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस हवालदार अजित जाधव पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर, हेमंत शिंदे श्रावण राठोड, प्रेम शिर्के यांनी पारगांव येथील एका लॉजवर छापा मारुन लॉजमधील रुम मधुन आरोपी.. 
१) अमन इस्माईल सय्यद रा बोपर्डी ता वाई जि सातारा 
२) संग्राम प्रकाश शिर्के रा मू.पो म्हसवे ता जावली जि सातारा
 ३) यश धनाजी घाडगे रा भुईंज जि सातारा 
४) करण छगन जाधव रा शिवथर ता जि सातारा 
५) दत्तात्रय आबा शिंदे रा शिंदेवाडी ता सातारा
 ४) करण छगन जाधव रा शिवथर ता जि सातारा
 ५) दत्तात्रय आबा शिंदे रा शिंदेवाडी ता जि सातारा यांस ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन १ पिस्टल ०३ जिवंत काडतुसे ०१ तलवार ०१ कोयता, ०१ लोखंडी सुरा व ०२ दुचाकी वाहने असा एकुण २,५३,१००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे 

माहे नाव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण ६८ देशी बनावटीची पिस्टल/कट्टे १७८ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली   वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, पोलीस उप- निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस हवालदार, अजित जाधव पोलीस अंमलदार , प्रसाद दुदुस्कर, पो.शि हेमंत शिंदे ,पो.शि , श्रावण राठोड, पो.शि  प्रेम शिर्के यांनी केली.

 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.