येथील लेखक व कवी लक्ष्मीकांत रांजणे यांच्या ‘मैना’ या कथासंग्रहाचा आणि ‘एक होती बहिरेवाडी’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे संपन्न .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

येथील लेखक व कवी लक्ष्मीकांत रांजणे यांच्या ‘मैना’ या कथासंग्रहाचा आणि ‘एक होती बहिरेवाडी’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे संपन्न .



सातारा जिल्हा प्रमुख - ओंकार पोतदार


येथील लेखक व कवी लक्ष्मीकांत रांजणे यांच्या ‘मैना’ या कथासंग्रहाचा आणि ‘एक होती बहिरेवाडी’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे संपन्न . 

कथा संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आणि ९१ व्या अ.भा.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते तर कादंबरीचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे ग्रामीण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. देशमुख यांनी रांजणे यांच्या वैशिष्ठयपूर्ण लेखनाचे पैलू दाखवत या कथा ग्रामीण व शहरी संस्कृतीला जोडण्याचे महत्वाचे काम करीत आहेत; या लेखकाने जास्तीतजास्त साहित्य निर्माण करून मराठी साहित्यविश्वात अशी अनेक पुस्तके आणावी कारण त्यांनी स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला आहे. असे मत व्यक्त केले. कादंबरीचे प्रकाशन करीत आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री. घट्टे यांनी श्री. रांजणे यांच्या ग्रामीण लेखन शैलीचे कौतुक करत, या लेखकाचं  मातीशी असणारं नातं विषद केलं. शहरात बाळाची नाळ हॉस्पिटल्स डस्टबिन मध्ये टाकतात; पण खेड्यात ती घरामागे मातीत पुरली जाते. म्हणून हे साहित्य आपल्याला मातीशी जोडतं. ही कादंबरी एक जिवंत सत्यकथा आहे. या कथेचा सिनेमा पडद्यावर यावा अशा शुभेच्छा श्री. घट्टे यांनी दिल्या. यावेळी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आणि ज्येष्ठ रंगकर्मी दीपक रेगे यांनी आपल्या खास शैलीत या कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन केलं. तर मुळच्या वाईच्या असणाऱ्या अभिनेत्री मधुरा टापरे-आगरकर यांनी ‘गंध’ या कथेचा एक भाग वाचला. ही दोन्ही पुस्तके कोल्हापूरचे राहुल प्रताप कुलकर्णी यांच्या रावा प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाईच्या सर्वांगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश भोज यांनी केले तर पुण्याच्या सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा सौ. नीनादेवी देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला वाई, पांचगणी, मुंबई व पुण्यातील नागरिक तसेच निळू फुले कला अकादमी, एकपात्री कलाकार परिषद-महाराष्ट्र, वसुधा क्रिएशन्स, कुसुमाग्रज कट्टा, सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघ-कोथरूड सदस्य, तसेच वाईचे प्राचार्य काशिनाथ बचुटे, सुभाष पाटणकर, संजय रांजणे, ऍड. दीपक मांगडे, दिलीप चरेगावकर, सौ. पूनम ससाणे, प्रा. सरोज वाघ,  उदय लागू, संदीप बर्वे, प्रदीप रत्नपारखे, विजय जोग, कुलदीप शिंदे, प्रा. अशपाक खान, प्राचार्य विशाल कानडे, विलास पिसाळ, डॉ. नंदकुमार भिलारे, डॉ. नेहा भिलारे, वसंत भरम, दिनेश फडतरे, डॉ. जयवंत अवघडे, विश्वास पटवर्धन, सौ. सोनाली भोज, सौ. विभा काळे, सौ. जयश्री वानखेडे, संतोष रांजणे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.