विकास मगदूम :कष्टकऱ्यांचा लढवय्या नेता ----पृथ्वीराज पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विकास मगदूम :कष्टकऱ्यांचा लढवय्या नेता ----पृथ्वीराज पाटील


लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

विकास मगदूम :कष्टकऱ्यांचा लढवय्या नेता
------पृथ्वीराज पाटील

सांगली दि. २४: हिंद मजदूर सभेचा.. कष्टकऱ्यांचा झुंजार लढवय्या नेता.. माझा सहकारी मित्र साथी विकास मगदूम हे कष्टकरी दौलत सताड उघडे ठेवून घाम गाळून पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून हाकेला ओ देणारा चांगला उमदा नेता आहे असे गौरवोद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले. मार्केट यार्डातील हमाल भवनमध्ये हमाल पंचायत आयोजित  त्यांच्या ५० व्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी शाल व बुके देऊन त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला. अध्यक्षस्थानी माजी महापौर सुरेश पाटील होते.
आदगोंडा पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  
   मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुजय शिंदे म्हणाले, 'विकास मगदूम ही कष्टकऱ्यांची दौलत आहे. मार्केट कमिटी व हमाल पंचायतीच्या साथीने समन्वय राखून चांगले काम करु या.   . बापूसाहेब मगदूम यांच्यानंतर कष्टकऱ्यांच्या कामात विकास तसूभरही कमी पडले नाहीत. असे अजित दुधाळ म्हणाले.  
 अध्यक्षीय भाषणात सुरेश पाटील म्हणाले,' स्व. बापूसाहेब मगदूम यांनी कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वेचले. तोच वारसा पुत्र विकास नेटाने पुढे नेत आहेत.   कष्टकरी गरिबांच्या संसाराला हातभार लावत आहेत. 
यावेळी विकास मगदूम म्हणाले, ' कष्टकऱ्यांनी विश्वास दाखवला म्हणून गेली ३३ वर्षे काम करत आहे. माझी आई निरक्षर.. वडील  दोन वर्षे तुरुंगात.. कामासाठी कायम दौऱ्यावर अशा कठीण प्रसंगी खंबीरपणे तिनं  सांभाळ केला शिकवले..पत्नी आता  २६ वर्षे झाली ऑफिस सांभाळते. मी घरचे काम कधीच करत नाही. कष्टकरी हाच माझा संसार आहे.  राजकारणात निवडणुका लढविण्याचे नाही असा निर्णय घेतला. पुरोगामी विचारांचे समर्थन करणारे वडील बापूसाहेब, बी. आर. शिंदे, सुरेश पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले. या सर्वांच्या साथीने हमाल भवन, महिला माथाडी कायदा होऊ शकले.    कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडविल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मला उर्जा देणारी ठरली.

यावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी स्व. बापूसाहेब मगदूम व विकास मगदूम यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व  त्यांच्या कामातील,आई व पत्नी यांचे योगदान सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, अहिल्याबाई होळकर यांच्या केंद्रस्थानी असलेल्या  कष्टकऱ्यांचे, पोती वाहून पाटीवर चट्टे पडलेल्या हमालांचा वाली आहे असे नमूद केले. 

यावेळी केक कापून विकास मगदूम यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.  माजी महापौर सुरेश पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मार्केट कमिटीचे चेअरमन सुजित शिंदे, बाळासाहेब बंडगर, अजित दुधाळ, काडाप्पा वारद व हमाल तोलाईदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आदगोंडा पाटील यांनी केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.