26जानेवारी २०२४ रोजी सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचा जिल्हा मेळावा सांगली मराठा समाज हॉल मध्ये संपन्न...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

26जानेवारी २०२४ रोजी सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचा जिल्हा मेळावा सांगली मराठा समाज हॉल मध्ये संपन्न...



२६ जानेवारी २०२४ रोजी सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचा जिल्हा मेळावा सांगली मराठा समाज हॉल मध्ये संपन्न...

स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतर सुद्धा सतत समाजजागृती करत सामाजिक प्रश्नांची आक्रमकपणे मांडणी करत लोकशाही राज्य असणाऱ्या देशातील राज्यकर्त्यांवर वचक ठेवण्याचे काम वृत्तपत्रे करत आली. यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात ते "वृत्तपत्र विक्रेते" विविध प्रकारच्या बातम्या, माहिती, जाहिराती असा माहितीचा खजाना वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचं काम वृत्तपत्र विक्रेता उन.वारा.पाऊस.कोविड अशा अनेक संकटांवर मात करत अनेक वर्षांपासून करत आला आहे.

जिल्ह्यात या वृत्तपत्र वितरण व्यवसायाला मोठी परंपरा आहे.


या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर दादा गाडगीळ , सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर,यांच्यासह अधिकारी व वृत्तपत्र विक्रेता शिखर संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व विक्रेते यांची उपस्थितीत लाभली होती


 या निमिताने वृत्तपत्र वितरण क्षेत्रामध्ये सांगली व एकूणच महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान नक्कीच वाखाणण्याजोगे आहे ,वृत्तपत्र विक्रेत्यांची प्रमुख मागणी "वृत्तपत्र विक्रेता महामंडळ" अंतिम टप्प्यात असून या बाबतीत महाराष्ट्र सरकार व मंत्री म्हणून लवकरच न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले 

महाराष्ट्रातील वृत्तपत्र वितरण विक्रेत्यांच्या समस्यावर बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की,


 संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेते संघटनेची "महामंडळ'' मागणी साठी ठाण्याचे आमदार केळकर यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झालेली असून ,मी या मागणीसाठी  स्वतः प्रयत्नशील असून लवकरच आपल्याला " महामंडळ " आपणास मिळेल याची ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात विशद केली..


सांगली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांशी संवाद साधताना म्हणाले की, सांगली महानगरपालिका म्हणून असणाऱ्या सर्व सुविधा वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलेल्या आहेतच ,त्यासाठी एक मोठा हॉल महापालिकेने उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु यानंतर सुद्धा महापालिकेचा कडून आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपणास काही मदत करता येत असेल तर आम्ही ती पूर्ण करू ,असे आश्वासन त्यांनी या वेळेला दिले..


या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी वृत्तपत्र विक्रेते आपल्या कुटुंबीयासह व वृत्तपत्रांचे सर्व संपादक व पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..


या मेळाव्याचे प्रमुख म्हणून पत्रकारांशी संवाद संवाद साधताना
विकास सूर्यवंशी (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटना)  म्हणाले की,

   सांगली जिल्ह्यातील लिमये,  दप्तरदार, माधवनगरचे पाटील बंधू जिल्ह्यातील विटा येथील भंडारी बंधू अशी अनेक उदाहरणे आहेत जी दोन- तीन पिढ्यांपासून वृत्तपत्र विक्री व वितरणाचा व्यवसाय करत आहेत. जिल्ह्यात सुमारे एक हजारहून अधिक कुटुंब या व्यवसायात आहेत. ३५ वर्षापूर्वी वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांना संघटित यश आले.   . इचलकरंजीचे भाऊ सूर्यवंशी, कोल्हापूरचे अण्णा पोतदार यांच्या सहकार्याने सांगलीत शंकर पाटील, यशवंत कुंभार, कुंडलचे अण्णा दौंडे आदी ज्येष्ठांनी वृत्तपत्र विक्रेते - वितरक यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्र विक्रेता क्षेत्रातील तरुण पिढी पुढे येऊन प्रमाकर भोसले, डी एस पाटील, शिवानंद चौगुले, माधव पतंगे, सुभाष चौगुले अशा काही मंडळींनी संघटनेचे काम पुढे नेले.
पंचवीस वर्षात संघटनेचं यश २००० साली सांगली शहर वृत्तपत्र मी 
विक्रेता संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करू लागलो आज या गोष्टीला २५ वर्षे होत आली याचं सिंहावलोकन केलं असता संघटना म्हणून अनेक बाबतीत चांगलं काम उभारता आलं याचं समाधान आहे. यामध्ये सांगली मिरज कुपवाड शहरातील सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांसह ग्रामीण मागातील ही एजंट बंधू-भगिनींचे मोठे सहकार्य लामले अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. सांगलीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज मोठी मजल मारली आहे असं अभिमानाने सांगावे वाटते. विक्रेता भवन वितरण, सेंटर आदर्श काम
विक्रेत्यांना वृत्तपत्र वितरण व इतर
कार्यक्रमांसाठी स्वतःच सभागृह असावं हे स्वप्न २००९ साली जिल्ह्याचे नेते व तत्कालीन मंत्री मदन पाटील यांच्या माध्यमातून साकार झालं. भाऊंचेच समर्थक माजी महापौर व मिरजेचे नेते किशोर जामदार यांच्या प्रयत्नातून सांगली बरोबरच मिरजेतही वृत्तपत्र विक्रेता भवन उभा राहिले. देशात पहिल्यांदाच सांगलीत व त्यानंतर लगेचच मिरजेत वृत्तपत्र विक्रेता 'भवन उभा राहणे हेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मोठे यश व अभिमानाची गोष्ट ठरली. शहरात वृत्तपत्र वितरणाचे काम एकाच ठिकाणी चालते,
विक्रेत्यांना वृत्तपत्र घेणे, पुरवण्या घालणे व इतर कामासाठी प्रशस्त व एकत्रित जागा मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात इतकं मोठं सेंटर कुठेही नाही याचा नक्कीच अभिमान आहे. हे संघटनेचे यश आहे.
संघटनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती अथवा इतर संकटात नेहमीच आपल्या परीने मदतीचा प्रयत्न केला आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये नाटकाचे आयोजन करून त्याचे उत्पन्न जत सारख्या दुष्काळी तालुक्यात देण्याचे काम केलं. सांगली मिरज कुपवाड शहरासह जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, संघटना यांनाही मदत करण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून चालू आहे. अनेक सामाजिक उपक्रम, कामांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम
विक्रेत्यांसाठी आधार विक्रेत्यांना न्याय मिळावा यासाठी सतत प्रयत्न केला जात असतो. गेली काही वर्ष वृत्तपत्र विक्रेत्यांना दीपावली कीट देण्याचा उपक्रम या संघटनेने यशस्वीरित्या राबवला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबाचा मेळावा घेण्याचे
उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत आहोत. जून- जुलैमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करणे, वहीचे वाटप करणे आदी उपक्रम राबवले जातात. अडचणीवेळी संघटना विक्रेत्याच्या पाठीशी ठामपणे राहते.
सामाजिक पत वाढवून देणारी संघटना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी यासाठी संघटनेने यशस्वी योगदान दिलेले आहे. समाजामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याची प्रतिमा सुधारणे, सकारात्मक व आदराचे स्थान निर्माण करण्याचे काम संघटनेच्या एकजुटीवर शक्य झाले. 
आहे. आज जिल्ह्यात वृत्तपत्र
विक्रेत्यांकडे मोठ्या आदराने पाहिले
जाते. या संघटनेला बळ देण्याचे
काम विक्रेता करत आहे याचा अभिमान वाटतो
वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी धडपड वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत करण्याचा प्रयत्न करताना शासन दरबारीही न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे. वृत्तपत्र विक्रेत्यांसह दहा लाख कुटुंबांचं आयुष्यात स्थिरता आणण्याचे, त्यांना न्याय देण्याचे काम मंत्री डॉ. खाडे करतील ही अपेक्षा व्यक्त केली

या मेळाव्यासाठी पुढील पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले..

   विकास सूर्यवंशी, प्रदीप आसगावकर, संजय सडकर, मारुती नवलाई, सुरेश कांबळे, नागेश कोरे, नारायण माळी, मिरजेतून रवींद्र धींगडे, आप्पा बरगाले, माने, प्रशांत जगताप ,तर सध्या सचिन चोपडे, दत्तात्रय सरगर, विशाल रासनकर, दरिबा बंडगर, अमोल साबळे, सागर घोरपडे, दीपक बाघमारे, बाळासाहेब पोरे, नंदू पोवाडे, विनायक तांबोळकर, गणेश आवळे, सुभाष जाधव, रामा कुंभार, राजू पोटे, देवानंद वसगडे आदी सह 
विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती मेळाव्याचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
______________________________________________________________

       बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत...
 "निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. मुंबई /रत्नागिरी. www.nisargbhumi.com 
व इस्टेट 99.इंडिया, www.estate99.in मुंबई. 
8830247886