श्रीराम भक्ती उत्सव आणि बेनाडीकर पाटील..! सहकार तपस्वी व माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या घराण्याला धार्मिक आणि सांस्कृतिक आचार विचारांचा समर्थ वारसा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

श्रीराम भक्ती उत्सव आणि बेनाडीकर पाटील..! सहकार तपस्वी व माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या घराण्याला धार्मिक आणि सांस्कृतिक आचार विचारांचा समर्थ वारसा...


श्रीराम भक्ती उत्सव आणि बेनाडीकर पाटील..!

सहकार तपस्वी व माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या घराण्याला धार्मिक आणि सांस्कृतिक आचार विचारांचा समर्थ वारसा आहे. आजही बेनाडीकर पाटलांनी हा वारसा श्रध्दापूर्वक चालू ठेवला आहे. गेली १२७ वर्षे बेनाडी येथील त्यांच्या वाड्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अखंड सुरु आहे. त्यानिमित्त ज्ञानेश्वरी व रामायणाचे पारायण प्रसाद अत्यंत भक्तीपूर्वक होत असते. त्यावेळी पृथ्वीराज पाटील सहकुटुंब बेनाडीत या उत्सवात सहभागी होतात.

श्रीकृष्ण आणि श्रीरामभक्ती हे बेनाडीकरांच्या रक्तातच आहे.

अयोध्येच्या श्रीराम मंदिराची उभारणी झाली आणि दि.२२ जानेवारीला त्या मंदिरात श्रीरामलल्लांची विधीवत तेथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्रतिष्ठापनाही केली. इकडे सांगलीत पृथ्वीराज पाटील यांना एकच चिंता होती आणि ती म्हणजे आपल्या सांगलीकरांना यावेळी सगळ्यानाच अयोध्येला जाता येणार नाही. मग पृथ्वीराज बाबांच्या मनात विचार आला की सांगलीतच अयोध्येच्या श्रीराम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभी करायची आणि अयोध्येहून प्रभू श्रीराम, जानकी, लक्ष्मण आणि हनुमंतांच्या विधीवत पूजन करून आणि अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रदक्षिणा करून त्या मूर्त्या सांगलीत कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापित करायच्या. बाबांनी पुत्र विरेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अयोध्येला धाडलं.. विरेंद्रनी अयोध्येत जाऊन मूर्त्यांचे विधीवत पूजन व मंदीर प्रदक्षिणा करुन त्या सांगलीत आणल्या. दि.२१ जानेवारीला श्रीरामलल्लांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि दि.२२ ते २८ जानेवारी या कालावधीत श्रीराम मंदीर सांगलीकरांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सांगलीकरांनी या श्रीराम भक्ती उत्सवाला उदंड प्रतिसाद दिला. आणखी एक दिवस मंदीर खुले करा अशी मागणी भक्तांनी केली म्हणून दि. २९ जानेवारी रोजी पुन्हा एक दिवस मंदीर खुले झाले. या आठ दिवसात सुमारे दोन लाख भक्त या उत्सवात सहभागी झाले होते. दर्शन, प्रसाद, भजन, कीर्तन, गीतरामायण, व्याख्यान आणि शेवटी लेझर शो मधून श्रीराम दर्शन असा भरगच्च कार्यक्रम झाला. सांगलीच्या इतिहासात प्रथमच असे घडले अशी सांगलीकरांची प्रतिक्रिया आली. डॉ. पतंगराव कदम फौंडेशन, पृथ्वीराज पाटील फौंडेशन व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या संस्थांच्या सर्व घटकांनी सेवा योगदान दिले. आमदार, खासदार,स्थानिक लोकप्रतिनिधीं, नगरसेवक, सांगलीच्या परिसरातील गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य, पोलीस खाते, महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षण, सहकार, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी या भक्ती उत्सवाला भेटी दिल्या. लाखो लोकांनी श्रीराम भक्ती उत्सवात हजेरी लावून सांगलीत प्रभू श्रीरामांचं दर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले ही या उत्सवाची फलश्रुती मानावी लागेल. कीर्तन, भजन, गीतरामायणातून लोकांना श्रीराम कळाले.. एवढे मात्र निश्चित..!

प्रा. एन.डी.बिरनाळे
जनसंपर्क अधिकारी
पृथ्वीराज पाटील यांचे यशोधन सेवा व संपर्क कार्यालय, सांगली.


__________________________________________________________


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. सांगली.
__________________________________________________________

बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत..
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड .. व 
इस्टेट 99 इंडिया कं.मुंबई.






__________________________________________________________