बेस्ट नंतर .शिवडी-न्हावाशेवा चीर्ले मार्गे सागरी सेतू एनएमएमटी बस...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बेस्ट नंतर .शिवडी-न्हावाशेवा चीर्ले मार्गे सागरी सेतू एनएमएमटी बस...


.               

लोकसंदेश न्यूज रायगड/उरण प्रतिनिधी 

बेस्ट नंतर .शिवडी-न्हावाशेवा चीर्ले मार्गे सागरी सेतू एनएमएमटी बस...


 सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शिवडी-न्हावाशेवा चिर्ले सागरी सेतूवरून आता एनएमएमटी बसने ही सर्वसाधारण प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे. या सागरी मार्गावरून फक्त कार व  त्याच्यापेक्षा मोठ्या गाड्यांनाच परवानगी असल्यामुळे या पुलाचा आनंद सर्वसाधारण लोकांना नागरिकांना घेता येत नव्हता ती सुविधा आता बेस्ट व   या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. नेरूळ ते मंत्रालय अशी ही बससेवा असणार आहे. त्यानुसार या बसचे नियोजन सुरू आहे. सध्या नेरूळ ते मंत्रालय सकाळी आणि संध्याकाळी अशी दोनवेळा प्रवासी बस धावणार असली तरी भविष्यात  प्रवासांच्या संख्येत होणाऱ्या वा वाढीप्रमाणे  ही बस सेवा फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या बसमधून सागरी सेतूवरून प्रवास करण्याचा आनंद सर्वांना घेता येणार आहे.


मुंबई शहराला थेट नवी मुंबईशी जोडणारा शिवडी-न्हावाशेवा चिरले सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून सर्वांनाच या मार्गाचे आकर्षण आहे. त्यामुळे अनेक जण चारचाकी गाड्या घेऊन या मार्गावर फेरफटका मारण्यासाठी जात आहेत. या मार्गावर अजून कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी बस सुरू नसल्याने सर्वसामान्यांना या मार्गावर प्रवास करण्याचा आनंद अजूनही घेता आलेला नाही. काही परिवहन उपक्रम या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा विचार करत आहेत. त्यानुसार एनएमएमटीने या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.      खारकोपर ते उरण बसचा मार्ग बदलणार....

सध्या खारकोपर ते उरण मार्गावर धावणाऱ्या ११५ क्रमांकाच्या बसमार्गात बदल करून ही बस आता नेरूळपासून सागरी सेतूमार्गे मंत्रालयापर्यंत चालवली जाणार आहे. नेरूळमधून उलवे मार्गे गव्हाण फाट्यावरून जासई आणि तिथून सागरी सेतूमार्गे ही बस मंत्रालयात पोहोचेल. सध्या या मार्गावरून सकाळी आणि संध्याकाळी अश्या दोनच फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर बसला मिळणारा प्रतिसाद पाहता बसफेऱ्या वाढवण्याचा विचार केला जाईल.


         तिकीट दराचा निर्णय अद्याप नाही

एनएमएमटीकडून बसमार्गांसाठी किमीनुसार तिकीटदर आकारले जातात. त्यानुसार, या मार्गावरील तिकीटदर आकारले जाणार आहेत. या मार्गावरील टोलचा भार प्रवाशांवर पडणार नाही, असाही विचार सुरू आहे. मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र शहरात ज्याप्रमाणे मेट्रो रेल्वे सुरू झाल्यापासून अनेकजण मेट्रोमधून फिरून यावे म्हणून प्रवास करताना दिसत आहेत, त्यानुसार अनेकजण सागरी सेतूवरून फिरण्यासाठी या बसमधून प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बसला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एनएमएमटी परिवहन उपक्रमाने व्यक्त केला आहे.


एनएमएमटी परिवहन उपक्रमाने प्रवाशांसाठी नेहमीच चांगली बससेवा दिली आहे. त्यानुसार, या नवीन सागरी सेतू मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या बसवाहतुकीचे नियोजन सुरू असून त्यावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल आणि ही बस प्रवाशांच्या सोयीसाठी हजर होईल. या सेवेच्या माध्यमातून सागरी सेतूवरून प्रवास करण्याचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.

______________________________________________________________________________________

बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत.. निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड व इस्टेट 99 इंडिया,मुंबई.


______________________________________________________________________________________