दक्षिण भारत जैन सभेतर्फे संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांना विनयांजली ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दक्षिण भारत जैन सभेतर्फे संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांना विनयांजली ...लोकसंदेश न्यूज नेटवर्क

दक्षिण भारत जैन सभेतर्फे संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांना विनयांजलीसांगली : युगश्रेष्ठ, अध्यात्मिक राजहंस, संतशिरोमणी प.पू.108 आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे डोंगरगड-चंद्रगिरी येथे समतापूर्वक सल्लेखना झाली. यानिमित दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने दि.19 फेब्रुवारी रोजी दु.4 वा. विनयांजली सभा घेण्यात आली.

प्रारंभी द.भा.जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी आचार्यश्री यांचा परिचय करून दिला. पूज्यश्रींनी आपल्या अत्यत निर्दोष मुनिचर्येतून जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. राष्ट्रसंत आचार्य विद्यानंद महाराज यांच्यानंतर संपूर्ण देश नव्हे तर विश्र्वामध्ये आपल्या मुनिचर्येचा प्रभाव निर्माण करणारे असे अलौकिक व्यक्तिमत्व हाोते. दक्षिणेत जन्मलेल्या आचार्यश्रींनी आपला बहुतांश विहार हा बुंदेलखंड, राजस्थान आणि मध्यप्रध्येश परिसरात व्यतित केला. त्यांचा पुढील चातुर्मास आपल्या भागात होईल अशी आशा आपल्या प्रत्येकांच्या मनात होती पण ती दुर्दवाने होवू शकले नाही. मुनिचर्येचा अत्युच्च क्षण म्हणजे सल्लेखना असल्याने त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे समाधी साधली. असा महापुरुष या पृथ्वीतलावर होने अशक्य आहे.

जैन महिला परिषदेच्या चेअरमन सौ. स्वरूपा पाटील (यड्रावकर) म्हणाल्या, जूण एका युगाचा अंत झालाय असे वाटत आहे. आचार्यश्री काळाच्या पुढे जावून विचार करायचे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतके प्रचंड कार्य आचार्यश्रींनी करून ठेवले आहे. क्षणोक्षणी संपूर्ण प्राणीमात्रेचा मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. वेळोवेळी त्यांच्या दर्शनाचा आणि आहार देण्याचे भाग्य लाभले हे मी माझे भाग्य समजते.
माजी महिला महामंत्री सौ. भारती चौधरी, म्हणाल्या, त्यांच्या दर्शनाने आणि निर्दोष मुनिचर्या पाहून जणू वीतराग भगवंताचे प्रतिमूर्ती आहेत असेच भासायचे. त्यांच्यामुळे माझ्यासह असंख्य श्रावक-श्राविका धर्माकडे वळल्या, सन्मार्गाकडे वळल्या.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत चौगुले म्हणाले, जैन धर्मामध्ये अलीकडे विसाव्या शतकात दिगंबर मुनी आणि आचार्य परंपरा प्रथमाचार्यश्री शांतिसागर महाराज यांनी सुरू केली. त्यांच्याच परंपरेतील आचार्य वीरसागर, आचार्य शिवसागर, आचार्य ज्ञानसागर आणि पुढे आचार्य विद्यासागर यांनी ही दिगंबर मुनिपरंपरा प्रत्यक्षात विश्र्वभर प्रबुध्द करण्याचे कार्य केले. भारतीय संस्कृतीला ‘जगावे’ आणि ‘मरावे’ कसे याची महिमा फक्त जैन संस्कृतीने दिले त्याचे प्रत्यंतर प्रथमाचार्य शांतिसागर महाराजानंतर आचार्य विद्यासागरांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतून विश्र्वाला दाखवून दिले आहे. आपल्या सर्वांचे अहोभाग्य आहे की अशा आचार्यांच्या काळात आपण त्यांना अनुभवतो आहोत.
महामंत्री प्रा.एन.डी.बिरनाळे म्हणाले, आचार्यश्रींच्या वियोगाने संपूर्ण भारतातील समाज हादरला आहे. आचार्यरत्न देशभूषण, आचार्य विद्यानंद, आचार्य शांतिसागर आणि आताचे आचार्य विद्यासागर अशा अनेक महान आचार्याना जन्म देणाऱ्या कर्नाटक भूमीचे जैन धर्मावर नव्हे तर या देशावर अनंत उपकार आहेत. ‘मूकमाटी’ या महाकाव्यातून आचार्यश्रींनी आतापर्यंतच्या सर्व आचार्यांच्या विवेचनाचा सार सांगितला आहे. प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराजानंतर निर्दोष मुनिचर्या पालन करणारा एक ऐतिहासिक अध्यात्मिक महापुरुष म्हणून आचार्यश्री विद्यासागर महाराज यांना युगानुयुगे ओळखले जाईल.
चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील म्हणाले, अत्यंत कठिण  अशा मुनिचर्येतील 28 मुलगुणांचे पालन करीत असतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि स्मीत हास्याची लकेर ,  त्यांची सदैव झुकलेली नजर  प्रत्येकाला मोहित करीत असे. त्यांच्या एका दर्शनाने प्रत्येकजण त्यांचा होवून जायचा. जैन दर्शनात सांगितलेली दया आणि अनुकंपा ही त्यांनी आापल्या आचरणात आणली.  संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी  ते जगले, झिजले आणि आापल्या देह त्याग केला. त्यांच्या विचारांचा आणि तत्त्वांचे पालन करणे आणि संघटीत राहणे हीच त्यांना खरी विनयांजली असेल.
केंद्रीय उपाध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील म्हणाले, माझ्या भाग्यामुळे पूज्य आचार्यश्रींच्या दर्शनाचा आणि  दक्षिण भारत जैन सभेच्या एकूण सामाजिक कार्याविषयी त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा लाभ मिळाला. दोन दिवस त्यांचे पूर्ण सानिध्य लाभले. त्यांच्या सभोवती निरंतर हजारोंची गर्दी असे. तरीही ते स्वत: विरक्त असत. हृदयात दया आणि अनुकंपा असून उपयोगी नाही ती आचरणात आणली पाहिजे असे ते म्हणत . त्यासाठी पूज्यश्रींनी  युवक आणि युवतींवर संस्कार, गोशाळा,  वंचितांना आधार, तुरुंगातील कैद्यासाठी हातचरखा अशा अनेक लोकोपयोगी उपक्रम  त्यांनी भारतभर चालविल्या.  आपण आज एका अत्यंत महान आध्यात्मिक महापुरुषाला मुकलो आहोत.  त्यांच्या वियोगाने जैन समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील खूप मोठी हानी आहे असे मला वाटते. असा आध्यात्मिक महापुरुष पुन्हा होणे कठिण आहे.
यानंतर  आचार्यश्रींच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून  नऊवेळा णमोकार महामंत्राचे जाप्य घालून आचार्यश्रींना मोक्षगतीसाठी  विनयांजली वाहण्यात आली.  

विनयांजली सभेसाठी सभेचे पदाधिकारी शांतिनाथ नंदगावे,  कमल मिणचे, प्रा.ए.ए.मुडलगी, एस.डी.आकोळे,श्री.मासुले, सुनिल पाटील, प्रा.बी.बी.शेंडगे, ॲड.मदन पाटील, महावीर खोत, ए.बी.पाटील, डॉ. देवपाल बरगाले यांच्यासह सौ.अंजली कोले, अनिता पाटील, छाया कुंभोजकर, गीतांजली उपाध्ये, ॲड. प्रेमलता शेट्टी, विजया कर्वे, मंगल चव्हाण , सौ. सुरेखा मुंजाप्पा, श्रीमती गाडवे, सुनिता चौगुले, सौ.फराटे यांच्यासह  विविध शाखेचे पदाधिकारी तसेच परिसरातील असंख्य श्रावक-श्राविका उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.
________________________________________________________________________________


बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत.. निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड व ईस्टेट 99 इंडिया, मुंबई.


________________________________________________________________________________