सर्व पक्षसमितीचे सतीश साखळकर व सहका- या च्या वतीने अजितदादांच्या समोर सांगलीच्या समस्याचा वाचला पाढा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सर्व पक्षसमितीचे सतीश साखळकर व सहका- या च्या वतीने अजितदादांच्या समोर सांगलीच्या समस्याचा वाचला पाढा...



सर्व पक्षसमितीचे सतीश साखळकर व सहका- या  च्या वतीने अजितदादांच्या समोर सांगलीच्या समस्याचा वाचला पाढा...

मा.अजित दादा पवार
     उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना आज् 
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्या बाबत पक्ष समितीचे श्री. सतीश साखळकर व सहका-यांच्याकडून आज निवेदन देत सांगलीच्या समस्यावर माननीय उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे


सदरच्या निवेदनामध्ये समितीने पुढील मागण्या निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्यांच्याकडे  मांडल्या आहेत  

           त्या पुढील प्रमाणे..
 
         सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामाच्या  बाबतीत आपणाकडुन शहर वासियांना अपेक्षा आहेत...




1) सद्या वारंवार सांगलीची कृष्णा नदी कोरडी पडत आहे त्याबाबत समन्वय साधुन नियोजन करण्यात आले होते मात्र त्या पद्धतीने कार्यवाही होत नाही त्यामुळे मनपा क्षेत्रातील पाणी पुरवठा वर परिणाम होत आहे मा.नाम.शंभुराजे देसाई यांच्या बरोबर चर्चा करून कृष्णा नदी कोरडी पडली नाही पाहिजे ह्या बाबतीत आदेश व्हावेत अशी विनंती आहे.
 

2) संपुर्ण महाराष्ट्रात ज्याच्या बदल आदर असणारे स्वर्गीय पद्मविभुषण वसंतरावदादा पाटील यांचे सांगली शहरातील स्मारक अपुर्ण  राहिलेले आहे त्यांच्या नंतर राजकारणात येऊन दिवंगत झालेल्या नेत्यांची स्मारके झाली मात्र दादांच्या स्मारक बाबतीत निधी अभावी बंद आहे त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी विनंती आहे. 


3) सांगली शहरातील कृष्णा नदीच्या दुषित पाण्यावर आता पर्यंत राजकारण झाले आहे मात्र त्यावर उपयोजना झाल्या नाहीत शासन स्तरावर एच टी पी प्लांट (HTP PLANT) तांत्रिक मंजुरी मिळाली आहे अजुन प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी व त्यासाठी लागणारा निधी मंजुर करण्यात यावा. 


4) सांगली आणि मिरज शहरांना जोडणारा नवीन रस्ता आवश्यक असताना देखील त्या बाबतीत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत आमच्या मनपा ची आर्थिक परिस्थिती पाहता भुमी अधिग्रहण करून रस्ता करणे शक्य नाही तरी राज्य सरकारकडून ह्या बाबतीत भुमी अधिग्रहण सह रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती आहे.

5) सांगली शहर पासुन  जवळ असणाऱ्या माधवनगर,बुधगाव गावातुन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी डी पी प्लॅन मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासुन प्रस्तावित असणार रिंग रोड विकसित करण्यासाठी भुमी अधिग्रहण सह रस्ता करण्यासाठी निधी मंजुर करण्यात यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे


6) आमच्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका कवलापुर विमानतळ 1963 पासुन असताना देखील ते विकसित करण्यात आली नाही सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाची 160 एकर जमीन उपलब्ध असून केंद्र सरकारच्या उडाण योजनेच्या यादीत कवलापुर विमानतळ चे नाव आहे स्वर्गीय आमदार अनिल बाबर,आमदार सुधीर दादा गाडगीळ साहेबांची ह्या बाबतीत विशेष प्रयत्न केले आहेत मात्र त्या बाबतीत पुढील कार्यवाही साठी आपणा कडून संबंधितांना आदेश व्हावेत अशी विनंती आहे.


7) सांगली शहरातील महत्वाचा रिंग रोड छत्रपती शाहु महाराज रोड (100 फुटी रोड) राज्य सरकार कडे त्या बाबतीत प्रस्ताव प्रलंबित आहे त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी विनंती आहे.


8) सांगली शहरातील विस्तारित भागा साठी ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकार कडे पाठवण्यासाठी मनपा आयुक्त यांना आदेश द्यावेत .


9) सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात डी पी रोड ची आरक्षित असलेल्या जागेवर गुंठेवारी करून मोठ्या प्रमाणात प्लॉट पाडण्यात येत आहेत त्याला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त यांना आदेश द्यावेत तसेच आमच्या मनपा ची आर्थिक परिस्थिती पाहता सदर रस्ते विकसित करण्यासाठी व अधिग्रहण करण्यासाठी निधी उपलब्ध कोणत्या उपाययोजना करून करता येईल ह्या बाबतीत राज्य सरकारने धोरण ठरवावे अन्यथा निधी अभावी डी पी रोड विकसित होणार नाहीत. 

मागण्या भरपुर आहेत आणि आपल्या कामाचा आवाका पाहता आपल्याकडुन शहरवासियांना अपेक्षा आहेत आणि त्या आपण 100 % पुर्ण कराल अशी आशा व्यक्त करत आहोत तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामाच्या बाबतीत मंत्रालयात स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी यांची व्यापक मीटिंग घेण्यात आली तर फार बरे होईल अशी विनंती आज निवेदनाद्वारे माननीय अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली.
या वेळी 
श्री.सतीश साखळकर,श्री.गजानन साळुंखे,श्री.तानाजी सरगर,श्री.पैलवान प्रमोद पाटील,श्री.आनंद देसाई, व इतर सर्व कार्यकर्ते हजर होते


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई
 सांगली.

_______________________________________________________________

बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत.....
 निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड व इस्टेट 99 इंडिया मुंबई.





_______________________________________________________________