अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपये झटपट कमवण्याच्या इच्छेने अनेकजण वाळू तस्करीकडे वळत आहेत.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपये झटपट कमवण्याच्या इच्छेने अनेकजण वाळू तस्करीकडे वळत आहेत.....लोकसंदेश न्यूज ओंकार पोतदार वाई प्रतिनिधी

अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपये झटपट कमवण्याच्या इच्छेने अनेकजण वाळू तस्करीकडे वळत आहेत. या वाळू माफियांवर जिल्हा गौण खनिज विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असते. अनेक पोलिस ठाण्यांत वाळू तस्करांवर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत व वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यात १ एप्रिल ते १ मार्च या कालावधीत अवैध वाळू व उत्खननाची १८४ प्रकरणे उघड झाली त्यात वाळू, मुरूम, माती, दगड या प्रकारची गौण खनिजे असून त्यात ४ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.४.४१ कोटींचा दंडसातारा जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ ते १ मार्च २०२४ पर्यंत अवैध उत्खनन व वाहतुकीच्या १८४ प्रकरणात ४.४१ कोटी रुपये दंड आकारला आहे.
त्यापैकी १ कोटी ८६ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय सहाजणांवर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तस्करी करणारी वाहने जप्तअवैध रेतीची तस्करी करताना गौण खनिजविभागाकडून वाहने जप्त करण्यात येतात. जिल्हा खनिकर्म विभागाकडून आतापर्यंत ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. अनेकदा बरेच दिवस ती वाहने संबंधित पोलिस स्टेशन हद्दीत जमा असतात तर काही तहसील कार्यालयांच्या आवारात पडून असतात.लिलाव करून पैसे वसूल करणार रेती तस्करी करणारे अनेक वेळा जुन्या वाहनांचा वापर करतात. त्यामुळे प्रशासनाने एखादे वेळी वाहने जप्त केल्यास वाहन मालकांचे फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे अनेकदा जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्याच्या भानगडीत वाहन मालक पडत नाहीत. मात्र, विनाकारण जागा अडकून पडते. या कार्यालयांच्या आवारात सध्या जागा अपुरी पडत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.

__________________________________________________________________

बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत..
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रा.ली.व ईस्टेट 99 इंडिया, मुंबई. संपर्क:8830247886__________________________________________________________________