काँग्रेसमधील बंडखोरीचे खरे खलनायक जयंत पाटीलच ... विलासराव जगताप यांची जतमधील प्रचार सभेत केला गौप्यस्पोट....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काँग्रेसमधील बंडखोरीचे खरे खलनायक जयंत पाटीलच ... विलासराव जगताप यांची जतमधील प्रचार सभेत केला गौप्यस्पोट....



काँग्रेसमधील बंडखोरीचे खरे खलनायक जयंत पाटीलच ...
विलासराव जगताप यांची जतमधील प्रचार सभेत केला गौप्यस्पोट....

लोकसभेच्या निवडणुकी जाहीर झाल्यापासूनच सांगलीमध्ये  काँग्रेस ,शिवसेना ,राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट ) या ची चर्चा अपचूकच होत  होती ...

गेल्या वीस वर्षांमध्ये "सांगली काँग्रेस"च्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे..

सांगलीला या वीस वर्षांमध्ये मोठा "शाप' लागलेला आहे सांगलीची अवस्था अशी आहे कुणीही बाहेरून यावे  टिकली मारून जावे..

सांगलीतील मुख्य प्रवाहांमधील वसंतदादा गट असो अथवा मदनभाऊ गट असो किंवा पृथ्वीराज बाबा गट असो ही मूळ सांगलीतल्या शहरातील... या लोकांचं पानिपत्य कसं करावं याबाबतीत बाहेरून आलेल्या सर्व नेत्यांनी आपल्या वर्चस्वासाठी सांगलीतील या गटाला कायम दुय्यम वागणूकचीच भूमिका दिलेली आहे ...

यातूनच सांगली  काँग्रेस मूळ रसातळाला येण्याची चित्र आज आपण पाहत आहोत 

सांगलीमध्ये काँग्रेसला बलाढ्य विरोधी पक्ष कोणीही नव्हता आणि नाही ...सांगलीची काँग्रेस फक्त काँग्रेसवाल्यांनीच संपल्याचे दिसून येत आहे..

प्रत्येक निवडणुकीत या तीन गटांनी एकमेकांच्या पाय ओढाताणीमुळेच काँग्रेसची ही अवस्था झालेली आहे.. परंतु या सर्वांना कळालेच नाही की, काँग्रेस संपल्यानंतर आपण पण संपणार आहोत,,

आता या संपवा संपवी च्या राजकारणात काँग्रेसच सलाईनवर येऊन बसल्यामुळे आता तरी ही लोक शहाणे होतील काय याचा शोध घेणे गरजेचे आहे..

ज्या पक्षाची स्थापना "इटालियन सून"यांना पंतप्रधान करू नये अशा धर्तीवर झाली आणि ज्यानी बारामती मधून बाहेरची सून, मूळ पवार बाहेरचे पवार असा विषय केला त्यांची मानसिकता काय असावी..

सांगलीमध्ये या पंचवीस वर्षांमध्ये बरेच मंत्री ,सांगलीचे प्रमुख सत्ताधीश मग ते कोणत्याही पक्षाचे असो... परंतु  यांच्याकडून सांगलीच कल्याण काय झालेलं नाही हे सर्व जाणून-बुजून करण्यात आल आहे..

आता हे सांगण्याचं कारण असं आहे की ,सांगलीला खेड्याची स्वरूप देऊन आपली पोळी भाजण्यात ही मंडळी आघाडीवर होती आणि आहे 

सांगलीची कोणतीही प्रगती होऊ नये, सांगलीचा कारखाना कसा बंद पाडता येईल, सांगलीच्या बँका कश्या संपवता येतील आणि बऱ्याच प्रगतीच्या वाटा सांगलीसाठी कशा आणि कधी बंद करता येतील या "कार्यक्रम रुपी" मानसिकतेने सांगलीची ही दैना झालेली आहे.

मदनभाऊ यांच् राजकारण , त्यांना शह देण्यासाठी तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आकारण सांगलीची महानगरपालिका करून सांगलीवाल्यांच्या वर कराचा बोजा लादून ही व्यक्ती परत इस्लामपूरला निघून गेली..

महापालिका झाल्यानंतर सांगलीकरांना वाटलं काहीतरी आपलं कल्याण होईल, कल्याण तर राहोच 
 .परंतु टॅक्स रुपाने, कराच्या रूपाने सांगलीकर बोजाच्या खाली दबत गेली , अण्णासाहेब यांची ही खेळी सांगलीकर नागरिक आजतागायात भोगतायत..

आम्ही आमच्या प्रत्येक लेखात म्हणतो की,सांगलीची "ग्रामपंचायत" करा याचं मूळ कारण असं आहे की, ,सांगली मिरज कुपवाड मध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नसलेल हे खेडे गाव असलेली सांगली आहे ...त्याच्यामध्ये फक्त महापालिकेचा आव आणला जात आहे सर्वसाधारण व्यक्ती आपल्याच घरात भाड्याने राहल्यासारखे रहात आहे 

याची फिकर कोणाला नाही ही बाहेरची मंडळी येऊन सांगलीवर आक्रमण करून आपल्या आपल्या पिल्लावळना घेऊन सांगलीचे जसं वाटोळ करता येईल तेवढेच वाटोळ करून ही मंडळी निघून जातात आणि सांगलीकर त्यांच्या हातातले बाहुले बनवून राहतात ..

परंतु ,या बाबतीत सर्वांना एक धोक्याची घंटा अशी आहे की ,बाबांनो आज काहींजण  जात्यात आहेत ...तुम्ही पण सुपात आहात... सुपातून जात्यात जायला आपल्याला पण वेळ लागणार नाही... त्यामुळे '  "करेक्ट कार्यक्रम रुपी" कपट भावनाजी आहे ती कधी ना कधी आपल्याला व आपल्या राजकारणाला घेऊन बुडणारच आहे.. याच सुद्धा भान या लोकांनी ठेवलं पाहिजे ...

राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहील ...परंतु या पंचवीस वर्षात जे जे मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, त्यांना आमचा सवाल आहे की , त्यांनी सांगली साठी कोणते भरीव काम केलं.. जसे  महामार्ग जोडणी ,विमानतळ ,ड्रायपोर्ट अथवा सांगलीकरांच्यासाठी चांगला उद्योग, सांगलीची बाजारपेठ वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न ,सांगली साठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था किंवा सांगलीच्या पुराचे नियोजन ,हे काहीही झालेले नाही फक्त आणि फक्त आपली चार पिल्लावळ यांना जोपासण्यात ही मंडळी मशगुल असतात आणि सांगलीचा वाटोळ करून परत आपल्या गावी निघून जातात ...जसं ..

  जसं मोदी म्हणतात की" मै क्या मै फकीर हु "एक दिन झोला लेकर निकल जाऊंगा "तसे सांगलीचे वाटोळ करून ही मंडळी परत "झोला घेऊन आपल्या आपल्या गावी जाणार आहेत" हे नक्की...

तर विलासराव जगताप आणि जी गोष्ट गुलदस्त्यात होती,जी सर्वांना माहीत होती परंतु जाहीर वाच्यता करत  नव्हते ती त्यांनी चव्हाट्यावर आणलेली आहे

 सांगली काँग्रेसवाल्यांना आमचा एकच सल्ला राहील... किमान आता तरी आपले एकमेकांचे पाय ओढण्याची किमया करू नये... का तर प्रत्येक वेळा हा प्रयोग करून झालेला आहे.... परंतु आज तशी वेळ नाही..    आमचा सर्व काँग्रेसियाना ,काँग्रेसमधील सर्व गट तट व संस्थांना प्रामाणिक सल्ला राहील की, तुम्ही एकसंघ असाल तर या सांगलीमध्ये काँग्रेसला दुसरं कोणी दुश्मन नाही हे खरे ...

आपला:सलीम नदाफ; संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई) सांगली. 8830247886