ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन 6 लाख रुपये किंमतीचे 30 मोबाईल परत मिळवुन तक्रारदार यांना श्री जितेंद्र शहाणे साो पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे यांचे हस्ते केले परत.
श्री समीर शेख साो पोलीस अधिक्षक सातारा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई श्री बाळासाहेब भालचीम यांनी मा.जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे यांना वाई शहर तसेच सातारा जिल्ह्यातील हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारी बाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई यांनी गन्हे प्रकटीकरण पथकास योग्यते मार्गदर्शन करुन सदरचे गहाळ झाले मोबाईलचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार तात्काळ कारवाई करत वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन 6 लाख रुपये किंमतीचे 30 मोबाईल तक्रारदार यांना जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई यांचे हस्ते परत करण्यात आले आहेत.वाई शहर हे सातारा जिल्ह्यातील एक सांस्कृतिक व पर्यटन शहर म्हणुन ओळखले जाते वाई शहरात आजुबाजुच्या राज्यातुन विविध पर्यटनासाठी येत असतात त्यामुळे वाई शहरात खुप मोठी अशी बाजारपेठ आहे. त्यामुळे बाजारपेठेत तसेच प्रवासा दरम्यान मोबाई गहाळ होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांचे पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलचे सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातुन माहिती प्राप्त करुन पोलीस अंमलदार विशाल शिंदे याने त्याचे तांत्रिक विश्लेषण करत महाराष्ट्र राज्याचे विविध भागातुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केलेले आहे. सदर गहाळ मोबाईल मध्ये आयफोन सॅमसंग तसेच विविध नामांकित कंपनीचे मोबाईल प्राप्त झालेले असुन काही लोकांची परिस्थिती नसतांना हप्त्यावर घेतेलेले मोबाईल हरवल्यानंतर त्यांची मोबाईल परत मिळण्याची आशा दुरावलेली होती परंतु त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने जनसामान्यातुन पोलीस प्रशासनाविषयी उल्लेखनीय कामगिरीबाबत भावना व्यक्त होत आहे.
सदरचीकारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीमती आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री.बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधिर वाळुंज, पो.हवा विजय शिर्के, लेंभे, अजित जाधव पो. कॉ राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत, शिंदे, श्रावण राठोड, धिरज नेवसे, विशाल शिंदे ,रुपेश जाधव, गोरख दाभाडे यांच्या पथकाने केली आहे.मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी वाई तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया नेटवर्क मुंबई /सातारा
7709504356