सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व बैठक संपन्न....
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली २०२४( एस.ओ. पी ) मागदर्शक पुस्तिकेचे  अनावरण मा डॉ राजा दयानिधी ,जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले
आज दि १५/५/२०२४ रोजी सांगली  जिल्हाधिकारी कार्यालयात  ,नियोजन समिती सभागृहात   येथे ,मा   डॉ.राजा दयानिधी , जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी साठी  आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  
सदर बैठकीस मा संदीप घुगे ,सांगली पोलीस अधीक्षक, मा तुप्ती दोडमिसे मुख्य  कार्यकारी अधिकारी ,सांगली  जिल्हा परिषद ,
मा शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका ,यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे,
या वेळी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली  २०२४( एस ओ पी ) मारदर्शक पुस्तिकेचे अनावरण मा .राजा दयानिधी  जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे  .सदर एस ओ पी  बाबत सविस्तर माहिती मा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी  दिली आहे.
 . सदर बैठकीस  मा.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील ,मा अति आयुक्त,मनपा  रविकांत अडसूळ 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापक रफिक  नदाफ  ,सिस्टीम मॅनेजर तथा मनपाविशेष कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभाग  नकुल जकाते  तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते, 
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
 



 
 
 
 
 
