नमस्कार... सेंचुरी मार्केट कमिटी मधील सर्व सभासदांना नम्र विनंती..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नमस्कार... सेंचुरी मार्केट कमिटी मधील सर्व सभासदांना नम्र विनंती..



नमस्कार... सेंचुरी मार्केट कमिटी मधील सर्व सभासदांना नम्र विनंती..

बऱ्याच वर्षापासून सांगलीतील कोल्हापूररोड पासून वालचंद कॉलेज पर्यंत असणाऱ्या शंभरफुटी रोडचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे..

 तत्कालीन आयुक्तांनी शंभरफुटीचे सर्व मार्किंग करून अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश  दिल्यानंतर सेंच्युरी मार्केट कमिटी मार्फत ही अतिक्रमणे काढून घेतलेली आहेत.

त्या अनुषंगाने काल माननीय आयुक्त व प्रशासक श्रीयुत शुभम गुप्ता  यांनी शंभरफुटी वरील पाहणी केली असता काही ठिकाणी खांब रस्त्यावर आहेत, काही ठिकाणी रस्त्याचे व सेंटर डिव्हायडरचे काम अर्धवट झाले आहे ..अशा परिस्थितीत शंभरफुटी वरील सर्व सभासद व्यापाऱ्यांना मी अध्यक्ष म्हणून विनंती करतो की,काही संघटना याबाबतीत सतर्क झाल्या आहेत... त्या माध्यमातून शंभरफुटी रस्त्यात वरील अतिक्रमणाचा विषय धरून ठेवलेला आहे ..100 फुटीचे दुरावस्था करण्याची होण्याची प्रमुख कारणे म्हणजे 100 फुटीचे सॅटॅलाइट मोजणी होणे गरजेचे असताना व शंभरफुटीच्या दोन्ही बाजूला भोबे गटार आहे ती मार्किंग सोडून रस्त्यावर दहा फूट  आलेली आहे ..याबाबत तत्कालीन आयुक्त श्री. सुनील पवार यांना आम्ही याची कल्पना दिली होती ,परंतु याचे सॅटॅलाइट डीपी चे मार्किंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शंभरफुटीची अवस्था हीच राहणार आहे, तरी सर्व व्यापाऱ्यांना आमची विनंती असेल की, 100 फुटी वरील आपल्या असणाऱ्या व्यवसायातील सर्व वाहने, व साहित्य आपण नागरिकांना अडचण होणार नाहीत अशा ठिकाणी लावून आपला व्यवसाय करावा..

वालचंद कॉलेज पासून शंभर फुटी रोड पर्यंत सेंचुरी मार्केट कमिटीची  आमने-सामने असणारी आकाराशे सात दुकानदारांची असणारी सेंचुरी मार्केट कमिटी  संघटना 1992 पासून कार्यरत आहे ,वेळोवेळी सेंचुरी मार्केट कमिटीने शंभर फुटी रस्त्यावरील असणाऱ्या अडचणीसाठी प्रशासक व महापालिकेत सहकार्यच केलेल आहे व करीत आहे,

त्या सहकार्यातून हा शंभरफुटी रोड पूर्णत्वाकडे जात आहे.. शेवटच्या टप्प्यातील विजेचे खांब काढण्याची दिरंगाई प्रशासकाकडून होत असल्यामुळे खांबाच्या आडोशाला काही वाहने थांबणे उचित आहे ,तर ही खांबे हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी माननीय आयुक्तांनी भर देणे गरजेचे आहे...   

तसेच शंभर फुटी वरील सर्व सेंचुरी मार्केट कमिटीच्या सभासदांना आम्ही विनंती करतोकी ,प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका आपण पहिल्यापासून घेतच आहोत ,आता देखील प्रशासनाने शंभर फुटींची जिथे मार्किंग केलेल आहे त्या मार्किंगच्या बाहेर कोणतीही वस्तू , मशीनरी, चालू बंद वाहने अथवा आपले असणारे स्टॅन्ड किंवा बोर्ड हे लावू नयेत, अशी विनंती मी आपणा सर्वांना करीत आहे,
 असो.. धन्यवाद :

आपला ;सलीम नदाफ, अध्यक्ष सेंचुरी मार्केट कमिटी, सांगली शंभरफुटी रोड सांगली.. 
व 
अध्यक्ष: सांगली लोखंड मार्केट; कोल्हापूर रोड, आकाशवाणी जवळ, सांगली, (पश्चिम महाराष्ट्रातील 170 दुकानें एकत्रित असलेली संस्था)

8830247886
____________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.