मतदान जागृती..पदयात्रा उत्साहात संपन्न ...नागरिकांचा संवाद यात्रेस उदंड प्रतिसाद*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मतदान जागृती..पदयात्रा उत्साहात संपन्न ...नागरिकांचा संवाद यात्रेस उदंड प्रतिसाद*


       लोकसंदेश न्यूज नेटवर्क

*मतदान जागृती*
*पद यात्रा उत्साहात संपन्न .*
*नागरिकांचा संवाद यात्रेस उदंड प्रतिसाद*

आज दि २ मे रोजी साय ६-०० वाजता सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ४,ठिकाणी २८२ सांगली विधानसभा मतदारसंघात संवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.

४४ सांगली लोकसभा मतदार संघात मतदान जागृती साठी आणि
या २८२ सांगली विधानसभा मतदारसंघात  कमी टक्का  मतदान झालेल्या भागात मतदार जनजागृती करण्यासाठी पदयात्रेचे आयोजन  Sveep स्वीप अंतर्गत करण्यात आलेली आहे. *मा राजा  दयानिधी (  भा. प्र. से) जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी,* ४४ सांगली लोकसभा मतदारसंघ , 
यांच्या उपस्थितीत सांगली येथील लव्हली सर्कल   परिसर मध्ये साय ६-०० वाजता रोटरी क्लब सदस्य ,जेष्ठ नागरिक ,महिला ,तरुण यांच्या सहभागातून पदयात्रा सुरू झाली आणि संजय नगर चौक परिसरात नागरिकांशी प संवाद साधून  दिव्याग ,८५ वरील वयोवृद्ध ,महिला ,तरुण ,नवं मतदार यांना प्रशासन वतीने  देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबत सविस्तर माहिती मा जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 
सर्वांना  दि ७मे रोजी सकाळी ७-०० ते साय ६-००या वेळेत मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे.  
पद यात्रेची सांगता केली आहे. यावेळी उप निवडणूक अधिकारी नीता शिंदे , सहा निवडणूक अधिकारी आशिष बारकुल ,अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.


 *मा संदीप घुगे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक,*

 यांच्या उपस्थितीत सांगली येथील *पोलीस लाईन   ते विश्रामबाग* परिसर मध्ये साय ६-०० वाजता रोटरी क्लब सदस्य ,जेष्ठ नागरिक ,महिला ,तरुण यांच्या सहभागातून पदयात्रा मार्गक्रमण करत  अनेक नागरिकांनी या मध्ये सहभाग घेतला होता. मा पोलास अधीक्षक यांनी  नागरिकांशी संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले आहे, 


 *मा तुप्ती दोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी,*

 जिल्हा परिषद, सांगली , यांच्या उपस्थितीत सांगली येथील *झूलेलाल चौक   ते सम्राट व्यायाम मंडळ चौक*  परिसर मध्ये साय ६-०० वाजता रोटरी क्लब सदस्य ,जेष्ठ नागरिक ,महिला ,तरुण यांच्या सहभागातून पदयात्रा मार्गक्रमण करत सांगता केली . *मा शुभम गुप्ता ,आयुक्त* तथा प्रशासक सांगली
 मिरज आणि कुपवाड महापालिका,

यांच्या उपस्थितीत सांगली येथील बदाम चौक    परिसर मध्ये साय ६-०० वाजता रोटरी क्लब सदस्य ,जेष्ठ नागरिक ,महिला ,तरुण यांच्या सहभागातून पदयात्रा सुरू करून ते राम मंदिर चौक येथे  या वेळी उप आयुक्त तथा नोडल अधिकारी वैभव साबळे यांनी मतदान करण्या बाबत उपस्थितांना शपथ देऊन पद यात्रेची सांगता केली आहे,यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे,डॉ रवींद्र ताटे , सहा आयुक्त  कावडे श्रीमती घुगे ,  मानसिग पाटील वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगिर  कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.


या वेळी मतदान करण्यासाठी आवाहन पत्रक वाटप करून लोकशाही जयघोषात नागरिकांनी पद यात्रेत आपला सहभाग नोंदवला होता , 

  प्रशासकीय  अधिकारी तसेच शासकीय अधिकारी, जेष्ठ नागरिक ,सामाजिक संघटना मतदार इत्यादी   मान्यवरांच्या उपस्थितीत सदरची सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात वर नमूद परिसरात  भव्य पदयात्रा सुरू करून मतदान जनजागृत करण्यात आली आहे, 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.