भुईंजमध्ये टोळक्याकडून एकाला मारहाण : ग्रामस्थांमध्ये घबराट...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भुईंजमध्ये टोळक्याकडून एकाला मारहाण : ग्रामस्थांमध्ये घबराट...

    

ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख 

भुईंजमध्ये टोळक्याकडून एकाला मारहाण : ग्रामस्थांमध्ये घबराट...

भुईंज येथे प्रचंड वर्दळीच्या ठीकाणी टोळक्याने दांडक्याच्या साह्याने केलेल्या हल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी भररस्त्यात झालेल्या गँगवार स्टाईल हल्ल्याने संपुर्ण भुईंज परिसर हादरून गेला असून चोवीस तासानंतरही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

भुईंज ता. वाई येथे शुक्रवारी सायंकाळी आठच्या दरम्यान गणेश शिंदे याला टोळक्याने मोटर सायकल वरून येवुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी दबा धरून बसलेल्या सात ते आठ जणांनी रस्त्यात गणेश शिंदेला आडवून दांडक्याने मारहाण केली. यात गणेश शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडला. जखमीला वाई येथिल मिशन हॉस्पिटलला दाखल केले.गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेला चोविसतास उलटल्यानंतरही आरोपी उशीरापर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. विषेश म्हणजे हा संपुर्ण हल्ला विविध सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून हे फुटेज पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत आहे. या प्रकरणी कोणीही राजकीय हस्तक्षेप न करता भुईंज मधील वातावरण शांत रहाण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसविण्याची मागणी होत आहे.

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही

संबंधित घटना ही भुईंज कारखाना रस्त्यालगत असलेल्या उड्डाणपुलासमोर घडली आहे. गुंडगिरीने आदीच चर्चेत असलेल्या भुईंजमध्ये भरचौकात टोळीहल्ल्याचा हा भयानक थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत सर्वघटना स्पष्ट दिसत असूनही या बाबत तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. गेले काही दिवस शांत असलेले भुईंज गाव भरस्त्यातील फिल्मी स्टाईल हल्ल्याने हादरून गेले आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रा.ली.मुंबई /सातारा