सुरुर ता. वाई येथील माळावरची झोपडपट्टी येथे अनोळखी इसमाचा खून करुन अपघाताचा खोटा बनाव केलेला गुन्हा उघड, ४ आरोपी अटक.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सुरुर ता. वाई येथील माळावरची झोपडपट्टी येथे अनोळखी इसमाचा खून करुन अपघाताचा खोटा बनाव केलेला गुन्हा उघड, ४ आरोपी अटक.
ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख 

सुरुर ता. वाई येथील माळावरची झोपडपट्टी येथे अनोळखी इसमाचा खून करुन अपघाताचा खोटा बनाव केलेला गुन्हा उघड, ४ आरोपी अटक.


दिनांक 19/05/2024 रोजी सायंकाळी 3.46 वा. डायल 112 यर मोबाईल नंबर  वरुन कॉल आला की, "सुरुर पुलाखाली अपघातात जखमी झालेला एक अनोळखी इसम पडला आहे अॅम्बुलन्स व पोलीस पाठ्या" अशी माहिती मिळाल्याने भुईज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून जखमीस 108 अॅन्युलन्स मधून सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे उपचाराकरीता पाठवून दिले. त्यानंतर दिनांक 23/05/2024 रोजी 06.15 वा. सदरचा इसम सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे उपचारा दरम्यान मयत झाल्याने भुईंज पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजि. नंबर २२/२०२४ प्रमाणे मयत दाखल करणेत आले होते. सदर अकस्मात मयतेच्या तपासामध्ये माळावरची झोपडपट्टी, सुरुर तसेच सुरुर गावातील 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेरे पाहून त्यामध्ये संशयीत इसम हे दिनांक 19/05/2024 रोजी सकाळी एका मोटर सायकल वरुन दोघांचे मध्ये जखमीस बसवून घेवून जात असलेचे दिसून आले, त्यावरुन सदर मयताबाबत संशय निर्माण झालेने या अनुषंगाने तपास केला असता गोपनीय माहिती मिळाली की, त्यामध्ये सदरचा इसम हा अपघातात जखमी झालेला नसून त्यास पारधी आरोपी नामे जक्कल रंगा काळे याने त्याचे घरातील ३ लोकांसह मयताचे त्याच्या दुस-या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याचे डोक्यात दगड घालून जखमी केले होते. व त्यानंतर त्यास सुरुर पुलाखाली आणुन टाकुन आरोपी नामे मक्शा रंगा काळे याने त्याचा मोबाईल नंबर  वरुन डायल 112 वर फोन करुन अपघाताचा खोटा बनाव केला होता. म्हणून सदर मयतेच्या तपासात भुईज पोलीस ठाणे गु.र.नं 182/2024 भादविस कलम 302,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व आरोपी अक्कल रंगा काळे, मक्शा रंगा काळे हे सराईत गुन्हेगार असल्याने श्री. समीर शेख, भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग, श्री. अरुन देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाख्या सातारा यांनी सदरच्या गुन्हयातील आरोपी यांना ताब्यात घेणेबाबत सुचना विल्या होत्या, त्याप्रमाणे सदर गुन्हयातील आरोपी यांना पकडणेसाठी सपोनि रमेश गर्जे तसेच सपोनि रोहित फाणें यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण शाखा, भुईंज चे पथक तयार करण्यात आले होते.सदर पथकाने आरोपीचे ठाय ठिकाण्याची माहिती काढून 3 पुरुष व 1 महिला आरोपीस सुरुर परिसरातुन ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केलेचे सांगितलेने त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक केले आहे. मा.श्री. समीर शेख, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीम. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि रोहित फणें, पो.उप-नि.विशाल भंडारे, पोलीस अंमलदार वैभव टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगदणे, गणेश कापरे, संतोष संपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, अरुण पाटील, अमित संपकाळ, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, ऑकार यादव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, अमृत कर्पे, प्रविण पवार, शिवाजी गुरव, म.पो.कॉ. भाग्यश्री जाधव, रुपाली शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.आरोपी जक्कल रंगा काळे याचेवर 28 गंभीर गुन्हे दाखल असुन अटटल गुन्हेगारांकडुन खुनासारखा गंभीर गुन्हा उघड केल्याबददल सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.


लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई/ सातारा

संपर्क - 7709504356