सांगलीत "सांगली लोखंड मार्केट" व "सांगली स्क्रॅप मर्चंट असोसिएशन"चा माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीत "सांगली लोखंड मार्केट" व "सांगली स्क्रॅप मर्चंट असोसिएशन"चा माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा.....


लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

सांगलीत "सांगली लोखंड मार्केट" व "सांगली स्क्रॅप मर्चंट असोसिएशन"चा माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा.....
 
  सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना सांगली  लोखंड मार्केट व सांगली स्क्रॅप मर्चंट असोसिएशन, यांच्याकडून आज जाहीर पाठिंबा देण्यात आला. 

सांगली लोखंड मार्केट अर्थात भंगार बाजाराची स्थापना स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून झाली होती,गोरगरीब व रस्त्यावर बसून स्क्रॅपचे जुने मटरियल विकणाऱ्यांना एक चांगला न्याय देण्यासाठी, स्व .मदन भाऊंनी सांगली कोल्हापूर रोडवरील कचरा डेपोची जागा सांगली" स्क्रॅप मार्केट" म्हणजेच भंगार बाजार यांना देऊन त्यावेळी राष्ट्रपती दौऱ्याच्या वेळी त्याला सर्वांना पंधरा बाय वीसचे खुली जागा देऊन पुनर्वसित केले होते. 


त्यानंतर देखील मदनभाऊ यांच्या माध्यमातून या मार्केटचे अध्यक्ष सलीमभाई नदाफ यांनी या मार्केटमध्ये सोयीसुविधासाठी रस्ते ,लाईट, व पाण्याची व इतर सर्व व सुविधा, करून दिलेली होती.. त्याचीच जाण ठेवून आज सर्व स्क्रॅप व्यापारी अर्थात भंगार बाजारातील 170 दुकान गाळे धारकांनी व स्क्रॅप मार्केटचे सांगलीतील सर्व सभासदांनी काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार  
 विशालदादा पाटील यांना एक मुखी जाहीर पाठिंबा नेमिनाथ नगर राजमती भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला 



सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून या मतदारसंघात मूळ काँग्रेसचे असणाऱ्या विशालदादांना पद्धतशीर डावलण्याचे "कपट कृत्य" काही जणांकडून झाल्याने सांगलीकर दुखावलेले आहेत ,सांगली शहर व सांगली भागासाठी  आज पर्यंत झालेल्या सर्व मंत्री ,पालकमंत्री , आमदार , खासदार व इतर पक्षातील नेत्यानी सांगलीला आज पर्यंत दुजाभावच दिलेला आहे ,या  सांगलीतील जनतेच्या जीवावर व मतावर  निवडून जाऊन सांगली शहरासाठी कोणतेही भरीव उद्योग,  विमानतळ, एमआयडीसी ,अथवा ड्रायपोर्ट  महामार्गाची जोड मार्ग, असला कोणताही उपक्रम आज पर्यंत असणाऱ्या सर्व नेत्यांनी आणला नाही.. त्यामुळे सांगलीकर जनता या भुल थापा व "फेकूचंद थापा"ना  व "जुमले बाजी"ला कंटाळून, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीस  दूर करण्यासाठी म्हणून  एकवटली आहे.

 अपक्ष म्हणून विशालदादा पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. विविध सामाजिक व राजकीय संघटनाच्या बळावर विशाल दादा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अपक्ष उमेदवार असूनही जनतेतून त्यांना उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसादही मिळत आहे.  त्यातच आता सांगलीतील सर्व "स्क्रॅप मर्चंट असोसिएशन" व "सांगली लोखंड मार्केट" या संस्थांनी विशाल दादा पाटील यांना पाठिंबा दिल्याने  विशाल पाटील यांचे पारडे जड झाले आहे. 

या पाठिंबाचे पत्र  विशाल दादा पाटील यांना नेमिनाथ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले यावेळी सांगली लोखंड मार्केट व सांगली स्क्रॅप मर्चंट असोसिएशनचे कार्यकारी संचालक ,प्रतापराव विलासराव चव्हाण, उद्योगपती फिरोजभाई जमादार, वज्जुभाई तासगांवकर, निसार फकीर, बापूसाहेब चव्हाण,शहानवाज फकीर, विनायक पानसे,अंजुमभाई नदाफ, वैभव कदम, यांच्यासह सर्व संचालक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.