ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
*"ज्ञानदीप स्कूलचे दहावी परीक्षेत दैदीप्यमान यश"*
ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल, पसरणी ता. वाई या विद्यालयाचा दहावी एस.एस.सी बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला असून गेल्या एकोणीस वर्षांची परंपरा कायम राखून शाळेने उज्वल यश प्राप्त केले आहे. ज्ञानदीप स्कूल मधील कु. अदिती संदीप जगताप व अवनी सुनील देशपांडे या विद्यार्थिनींनी 98.00 टक्के प्राप्त करून शाळेत संयुक्तपणे प्रथम क्रमांक संपादन केला.कु.अंकिता राजेंद्र वाघ 97.60 टक्के (द्वितीय क्रमांक), कु. समीक्षा सचिन राऊत 96.40%(तृतीय क्रमांक), चि. श्रीसाईनाथ प्रवीण कोरडे 95.60% व कु सज्ञा ज्ञानदेव वाशिवले 95.60%(चतुर्थ क्रमांक) या दोघांनी संयुक्तपणे चतुर्थ क्रमांक मिळविला, कु.गौरी शेखर बाबर हिने 95.00% मिळवून (पाचवा क्रमांक)मिळवण्याचा बहुमान मिळवला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, सचिव बाळकृष्ण पवार, खजिनदार चंद्रकांत शिंदे, विश्वस्त श्री. विश्वनाथ पवार, श्री.जिजाबा पवार, प्रा.दत्तात्रय वाघचवरे, श्री.दिलीप चव्हाण, श्री.विजय कासुर्डे, श्री.दुष्यंत जगदाळे, श्री.रविंद्र केंजळे श्री.दत्ता मर्ढेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत ज्ञानदीप स्कूलचे 59 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 95 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 6 विद्यार्थी, 90 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 15 विद्यार्थी, 85 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 14 विद्यार्थी, 80 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 8 विद्यार्थी, 75 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 8 विद्यार्थी, साठ टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 7 विद्यार्थी आणि 60% पेक्षा कमी गुण असणारे 1 विद्यार्थी असे गुण प्राप्त करून विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.
विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशामागे शाळेच्या प्राचार्या, शुभांगी पवार तसेच इयत्ता दहावीला शिकवणारे व त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्गशिक्षक सौ. तेजस्वी जमदाडे, सौ. अस्मिता भोसले तसेच विषय शिक्षक श्री.अशोक बेडेकर, सौ.शीला खाडे, श्री.सचिन लेंभे, श्री. संजय डेरे, सौ. लता जाधव, कु.लिना जाधव, श्री. प्रमोद लोंढे, सौ. वैशाली वाडकर, कु. तेजल कदम, सौ. सरस्वती वाशिवले, श्री. संभाजी लावंड, सौ.कार्तिकी कासुर्डे यांचा मोलाचा वाटा आहे. सर्व विद्यार्थी ,शिक्षक, कर्मचारीवृंद व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क सातारा /सांगली
संपर्क - 7709504356
पत्रकार ओंकार पोतदार