खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या 4 गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या 4 गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.

 


ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख

पुणे - सातारा हायवे रोडवर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या 4 गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.

दिनांक 11/06/2024 रोजी रात्री भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.रमेश गर्जे, पोउपनिरीक्षक विशाल भंडारे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे शासकीय वाहनातून सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावार पेट्रोलींग करीत असताना सपोनि गर्जे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे येळे ता. वाई गावचे हद्दित करुणा मंदिरचे समोरील बाजुस, पुणे ते सातारा हायवे रोडचे पूर्व बाजुला झाडीमध्ये अंधारात पाच लोक त्यांच्या मोटर सायकल बाजुला लावून बसले असुन ते महामार्गावरुन जाणा-या लक्झरी बस लुटणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सपोनि गर्जे यांनी तात्काळ श्री. समीर शेख, भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग तसेच श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना माहिती दिली. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांच्य्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सपोनि श्री. रमेश गर्जे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी- अंमलदार यांनी साध्या वेशात मिळाले माहितीचे ठिकाणी जावून खात्री केली. त्यानंतर सोबतच्या पथकासह सापळा लावुन रात्री 21.30 वाजणेचे सुमारास अंधारात बसलेल्या दरोडयाच्या तयारीत असलेल्या 4 संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचे सोबत असलेला पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. परंतु ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडे विचारपूस केली असता ते पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातुन येवून खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून त्यातील प्रयाशांचे दागिने, पैसे लुटण्यासाठी त्या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. मंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक सुरा, दोन लोखंडी रॉड, प्लॅस्टिकच्या पिशवीत मिरचीची पुड, मोबाईल तसेच दोन मोटर सायकल असे एकूण 2 लाख 79 हजार रुपयाचे साहित्य मिळुन आले आहे. याबाबत पो.कॉ. रविराज वर्णेकर यांच्या तक्रारीवरुन भुईज पोलीस ठाणे गु.र.नं 198/2024 भादयिस कलम ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन पळून गेलेल्या 30 ते 35 वयोगटातील पाचव्या आरोपीचा शोध सुरु आहे.

मा.श्री. समीर शेख, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पो.उप-नि. विशाल भंडारे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव राजे, नितीन जाधव, आप्पासाहेब कोलवडकर, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अजय सपकाळ, सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.

आरोर्पीची नावे -

1) संतोष बाळासाहेब चव्हाण वय 34 वर्ष, रा. शिंदोडी, ता. शिरुर जि.पुणे,

2) अक्षय दत्तात्रय शितोळे वय26 वर्ष, रा. शिंदोडी, ता. शिरुर जि.पुणे,

3) सिध्दांत यशवंत कांबळे वय 31 वर्ष, रा. निमोने, ता. शिरुर जि. पुणे,

४) योगेश आनंदा वाळुंज चय 25 वर्ष, रा. रा.शिंदोडी, ता. शिरुर जि. पुणे