येड्यांची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस.. असंच काहीतरी सांगलीमध्ये घडत आहे....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

येड्यांची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस.. असंच काहीतरी सांगलीमध्ये घडत आहे....
               लोकसंदेश संपादकीय 

येड्यांची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस..
असंच काहीतरी सांगलीमध्ये घडत आहे....

सांगली मधून बाहेर जाणारे व येणारे रस्ते  बहुतकरून माधवनगर रस्त्याचे पुलाचे काम अर्धवट असताना बुधगाव  रस्त्याचे काम काढण्यात काय हशील आहे.. हा सांगलीकरांना प्रश्न पडत आहे या मध्ये काय गौड बंगाल असावे..

गेली दीड वर्ष झालं ...माधवनगरचा संपर्क तुटलेला आहे... सांगलीकर माधवनगर नागरिक व त्या रस्त्यावरील व्यापाऱ्यांची दैना झालेली आहे... त्याच्याकडे दुर्लक्ष करून... परत बुधगावचा पुल बांधण्याचा अट्टाहास का असावा !! यामध्ये कोणाचे लागेबांधे  जोडले गेलेले आहेत...


 या 25 वर्षात सांगलीच वाटोळ जेवढं करण्यात लोकप्रतिनिधींचा हात होता व आहे..आता सरकारी अधिकाऱ्यांचा हात असावा का??  असा प्रश्न आता सांगलीकरांच्या मनात उपस्थित होत आहे...

सांगलीची दैना कशी होईल  सर्व लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत पाहिलेल आहे.. पहात आहेत 
याचं प्रमुख कारण म्हणजे पेठ नाक्यापासून सांगलीपर्यंत चार पदरी रस्ता आज पर्यंत कोणी अडवला??  ....सांगलीला विमानतळ का होऊ दिलं नाही? सांगलीचे वाटोळ करण्याचं गणित कोण कोणत्या लोकप्रतिनिधीने केलं हे सर्वज्ञात आहे..

आणि अशा वेळेला सांगलीस जोडणारे रस्ते उकरून सांगलीला अधोगती कडे नेण्याचे काम आता सांगलीचे हे अधिकारी जर करत असतील तर हे अक्कलशून्य अधिकारी.... साध्या माणसाला गणित कळतं की , एका रस्त्याचे काम सुरू असेल तर .. दुसरा रस्ता बंद करता येत नाही... परंतु यांना का कळत नसाव.. याच 
 मोठं कोडं सांगली कराना पडलेल आहे ...

आम्ही असं म्हणतो सांगलीच्या बाहेर जाणारे सर्व  रस्ते एक वेळा बंद करून ठेवा ..

मध्ये  सांगली मिरज रस्ता कृपामाई जवळचा रेल्वे पुल करण्याचे ठरले होते... त्यामुळे सांगली मिरज रस्ता बंद होईल ...तिकडे धामणीला एखादा रस्ता उकरून ठेवा... तिकडे अंकलीचा एखादा रस्ता उकरून ठेवा... म्हणजे काय होईल सांगलीमध्ये येणारी व जाणारी सर्व वाहतूक  थांबेल व सांगलीचे व्यवस्थित पद्धतशीर अधोगती होईल... यासाठी आता लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा.. असं आम्हाला आता वाटत आहे...
असं म्हणतात की चार बुक शिकून अधिकारी फार मोठे शहाणे झालेल् असतात... त्यांच्या अंगावर पॅन्ट ,शर्ट  इनशर्ट , टाय आलेला असतो ...परंतु जरा अकलेचा भाग जरा कमीच येत असावा ...
असा आता आम्हास असे वाटत आहे ...

सांगलीचा माधवनगर पुल जोपर्यंत सुरू होणार नाही ..तोपर्यंत आजूबाजूचे रस्ते करण्यात काय मतलब आहे याचा विचार आता शासनाने व अधिकाऱ्यानी  केला पाहिजे 
तुमच्या टक्केवारीच्या नादात सांगलीकरांना का वेठीस धरताय हे गणित आता सांगलीकरांना कळालेल आहे ..
सांगलीसाठी कुठल्याही लोकप्रतिनिधीची आस्था नाही.. हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे ...
असो.... देव या शासनाला व अधिकाऱ्यांना सुबुद्धी देवो... यांच्या अंगावरील पॅन्ट शर्ट इनशर्ट टाय धारकांना अक्कल पण देवो अशी प्रार्थना करून आम्ही थांबतो... नमस्कार ... 

संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया.
8830247886


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.