नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच उडाले.. चाचणी विमान...
लोकसंदेश न्यूज मुंबई
नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच उडाले विमान
नवी मुंबई : नवी मुंबईविमानतळाच्या धावपट्टीवरून विमान उडताना आणि उतरताना कोणता अडथळा तर येत नाही ना, याची चाचणी करण्यासाठी स बुधवारी पहिल्यांदाच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सिग्नलसह विमानांची चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विशेष विमान नवी मुंबई विमानतळावरून उडणार असल्याचे समजताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
१३ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च २०२५ पासून येथून विमानाचे उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी अचानक नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घेण्यात आली. यामुळे विकासक कंपनी आणि सिडकोचा विश्वास दुणावला आहे. नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा सिडकोचा अंदाज आहे.
भारतातील सर्वात मोठ्या विमानतळावरून यशस्वी चाचण्या झाल्यामुळे नागरिक आनंदीत आहेत...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.
_______________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत..
निसर्गभूमी डेव्हलपर्स आणि इस्टेट 99 इंडिया.
आपल्या सर्व प्रकारच्या प्रॉपर्टी साठी कायदेशीर व योग्य व्यवहार करणारे एकमेव कंपनी..