लोकसंदेश न्यूज खालापूर प्रतिनिधी : भूषण प्रधान
खालापूर मध्ये शेतकऱ्याची जमीन बळकावण्यासाठी उद्योजकाचा दबाव...
नैसर्गिक पाणी अडवल्याणे चव्हाण कुटुंबाची शेती नष्ट होण्याच्या मार्गावर....
खालापूर तालुक्यातील शेतकरी चव्हाण कुटुंबिय यांना धनदांडग्यांकडून शेती करण्यास त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार होत आहे. ग्रामपंचायत वावर्ले येथील मौजे पाली बुद्रुक मधील चव्हाण कुटुंबिय यांची सर्व्हे नंबर ९४,९५,९९ मध्ये ९ एकर शेती आहे. काही भाग कर्जत तालुक्यातील नांगुर्ले हद्दीत येत असुन सुशिक्षित आणि उच्च वर्गीय असूनही चव्हाण कुटुंबिय १९७७ पासून आजही शेती व्यवसाय करून आपली शेती राखण्याचा प्रयत्न करीत आहेत.शेतीसोबत शेती पर्यटन सुद्धा ते करीत आहेत. मात्र त्यांच्या बाजूला सुमारे १७० एकर जागा असलेल्या ओलीयंडर फार्म तसेच सॉल्ट या तारांकित हॉटेल चे मालक अहूजा कुटुंबिय यांनी चव्हाण यांच्या जागेलगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या जागेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवून तलावाची निर्मिती केली आहे, मात्र नैसर्गिक रित्या वाहून येणारे पाणी अडवल्याने चव्हाण यांच्या शेतात पाणी थांबण्यास सुरुवात होऊन त्यांच्या भातशेतीचे नुकसान होत आहे.प्रशासनाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता धनिक लोक स्थानिक लोक स्थानिक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार पाहायला मिळत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुलै 2022 ला अचानक संपूर्ण शेतात पाणी आल्याने ही बाब चव्हाण कुटुंबिय यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब खालापूर तहसीलदार यांना अर्जाद्वारे कळवली. आहुजा यांनी तलावाची उंची वाढवल्याने त्यांच्या शेतात हे पाणी आले होते. परिणामी चव्हाण यांना भात शेती करता येत नव्हती. यावर वारंवार पाठपुरावा केल्याने खालापूर तहसीलदार यांनी २०जून २०२३ रोजी आहुजा यांना तलावाची उंची कमी करण्याचे निर्देश दिले. यावेळी अहुजा यांनी जबाब दिला की चव्हाण यांच्या शेतात पाणी जाणार नाही याची आम्ही काळजी घे. या ऑर्डर नंतर 12 जुलै 2023 रोजी प्रशासन आहुजा आणि चव्हाण कुटुंबिय यांची एकत्र बैठक सुद्धा झाली. त्यानंतर त्यांनी तलावाची उंची कमी करू म्हणून सांगितलं. मात्र त्यावर काहीच केले नाही. चालढकल करत राहिले. यावर अलका चव्हाण समेल यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पुन्हा 2024 पाऊस सुरू होण्याच्या आधी 7 जून 2024 रोजी आम्ही आमच्या वृद्ध आईसह खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. त्याची दखल घेऊन त्याच दिवशी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी त्या तलावाची उंची प्रशासकीय आदेशाने कमी केली. मात्र प्रशासनाच्या कारवाईचा उल्लंघन करून पुन्हा दुसऱ्या दिवशी अहुजा यांनी ती भिंत बांधली त्यामुळे आमच्या शेतात पुन्हा पाणी साठायला सुरुवात झाली. तसेच त्यांनी त्यांच्या दक्षिण दिशेला एक तलाव होते त्या तलावात भराव टाकल्याने पाण्याला प्रवाह न ठेवल्याने त्यांचे पूर्वेकडील पाणी आमचा जो नैसर्गिक धबधबा आम्ही बनवला होता त्यातून ९ जुलै रोजी पाणी वाहू लागल्याने प्रचंड मातीची धूप होऊ लागली होती. म्हणून मी तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच त्यांचे ऑलीयंडर फॉर्म चे मॅनेजर यांना कॉल केले मात्र त्यांनी कोणीही कॉल घेतले नाही, म्हणून मी आमच्या सामायिक बांधावर गेले, तिथे थांबले होते तिथे कबीर अहुजा आले आणि माझ्याशी भांडले माझं म्हणणं ऐकून घेतले नाही. मी त्यांना सांगितलं पाणी किती आहे बघा मात्र त्यांनी उलट मी त्यांच्या जागेत गेले म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला हे मला दोन दिवसांनी कळाले. म्हणजे त्यांनी पाणी कमी करण्यासाठी कुठले सहकार्य केले नाहीत, उलट स्वतः प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रशासनात सुद्धा दाद मिळत नाहीये. शासनाने आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावे हीच विनंती आम्ही आपल्या माध्यमांतून करीत आहोत...
असे आज या बाधित शेतकऱ्यांनी लोकसंदेश न्यूज कडे बोलताना ही मागणी केली..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई
.