कर्मवीर पतसंस्थेच्या ६३ व्या कागल शाखेचे नामदार हसन मुश्रीफ यांचे हस्ते उ‌द्घाटन संपन्न...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कर्मवीर पतसंस्थेच्या ६३ व्या कागल शाखेचे नामदार हसन मुश्रीफ यांचे हस्ते उ‌द्घाटन संपन्न...कर्मवीर पतसंस्थेच्या ६३ व्या कागल शाखेचे नामदार हसन मुश्रीफ यांचे हस्ते उ‌द्घाटन संपन्न

सांगली :- कर्मवीर पतसंस्थेने अल्पावधीत केलेली नेत्रदिपक प्रगती ही आर्थिक क्षेत्रात इतरांनी आदर्श घ्यावी अशी आहे. कर्मवीर पतसंस्थेने सर्वच क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे सभासदांचा चांगला विश्वास या संस्थेने प्राप्त केलेला आहे. हे संस्थेच्या प्रगतीवरुन दिसते आहे. कर्मवीर पतसंस्थेने सहकारातील अनेक मान्यवरांची शाबासकी मिळविली आहे. यावरुनच संस्थेच्या कार्याची माहिती होते असे उद्वार महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी काढले. त्यांच्या हस्ते संस्थेच्या कागल येथील ६३ व्या शाखेचा उ‌द्घाटन समारंभ मोठा उत्साहाने पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व छत्रपती शाहु महाराज आणि कर्मवीर भाऊराव आण्णांच्या प्रतिमा पुजनाने झाली. फीत कापून नामदार मुश्रीफ यांनी शाखा कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचे जाहिर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याचे माजी उर्जामंत्री वीरकुमार पाटील हे होते.


सुरुवातीला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्था सभासदांना देत असलेल्या सेवा सुविधांची माहिती उपस्थित कागल वासियांना दिली संस्था सेवा रुपाने कागल वासियांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास त्यांनी आपल्या स्वागतामध्ये व्यक्त केला. संस्थेच्या ठेवी रु. १११० कोटी असून संस्थेने रु. ८०५ कोटीचे कर्ज वितरण केले आहे. संस्था सभासदांना सर्व ऑनलाईन सेवा देत आहे. संस्थेचा स्वनिधी रु. १०७ कोटीचा असून गुंतवणुक रु.३८८ कोटी आहे. संस्थेचा मिश्र व्यवसाय रु. २००० कोटीकडे वाटचाल करीत आहे. संस्थेची सभासद संख्या ६५००० असल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थेच्या ६५००० सभासदांच्या सर्वांगीन उन्नतीचे स्वप्न घेऊन संस्थेचे संचालक मंडळ कार्यरत असल्यामुळे सभासदांनी संस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. संस्थेने सभासद ठेवीदार, कर्जदार सेवक या सर्वांची काळजी संचालक मंडळ घेत आहे हे श्री. रावसाहेब पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले,

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना मा. आ. वीरकुमार पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करुन संस्था एवढी मोठी झाल्याचा खुप आनंद असून आता संस्थेने आपले कार्यक्षेत्र वाढवून कर्नाटकामध्ये आपला शाखा विस्तार करावा अशी भावना बोलून दाखविली. सभासदांना सातत्याने उच्चांकी लाभांष देणारी कर्मवीर पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकीक आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांनी संस्थेच्या कार्याची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली,

कार्यक्रमास निवृत्त पोलीस अधिकारी श्री. सतिश माने, सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित पिष्ठे, अमित अजित अथणे, धन्यकुमार सुभाष पाटील, उद्योजक श्री. सागर माने, श्री. रमाकांत घोडके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

शाखेचे नुतन सल्लागार श्री. सुरज अजित अथणे, डॉ. झुंझारराव आनंदराव घाटगे, श्री. महेश अभय चौगुले, श्री. विजयकुमार महावीर पाटील, श्री. मनोज श्रीकांत व्हराटे, श्री. रत्नदिप सुधाकर चौगुले यांचा यावेळी नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देवून सत्कार क्रणेत आला. तर शाखाधिकारी श्री. किरण महावीर चौगुले व विभागीय अधिकारी श्री. अभिजीत जिनगोंडा खोत यांना प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास संस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. अ.के. चौगुले (नाना), श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, श्री. लालासो 'भाऊसो थोटे उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले. सुत्र संचालन संजय सासणे यांनी केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई./ सांगली.