अण्णाभाऊंची शपथ म्हणजे संविधान आचरणाचा संदेश सचिनभाऊ साठे; सांगलीत घेतली सार्वजनिक शपथ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अण्णाभाऊंची शपथ म्हणजे संविधान आचरणाचा संदेश सचिनभाऊ साठे; सांगलीत घेतली सार्वजनिक शपथ...



लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी 

अण्णाभाऊंची शपथ म्हणजे  संविधान आचरणाचा संदेश
 सचिनभाऊ साठे; सांगलीत घेतली सार्वजनिक शपथ...

सांगली प्रतिनिधी : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली शपथ म्हणजे मानवतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आचरण करण्यासाठी दिलेला संदेश आहे असे मत डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व अण्णा भाऊंचे नातू सचिनभाऊ साठे यांनी व्यक्त केले. 


   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर त्यांनी लिहिलेली शपथ सार्वजनिकरित्या घेण्यात आली. जयंती  महोत्सव समितीचे जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी हा शपथ सोहळा सांगलीत पार पडला. सचिन साठे म्हणाले, साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून दिन दलितांचे कष्टकऱ्यांचे दुःख आहे असे अण्णाभाऊ म्हणत होते. अण्णाभाऊ यांनी सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय स्वातंत्र्य अबाधित राहावे, समाज व्यसनमुक्त व्हावा, स्त्रियांचा‌‌सन्मान अंधश्रद्धा विरोधी भूमिका, स्वातंत्र्य समता बंधुता जपण्याचे आवाहन हे सर्व आज काळाची गरज बनली आहे. अण्णाभाऊनी दिलेली शपथ सर्वांनी घेतली पाहिजे आणि पाळली पाहिजे असे मत सचिन साठे यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे, राम कांबळे सर, प्रा. डॉ. जगन कराळे, प्रा. डॉ. शशिकांत खिलारे, डॉ. नामदेव कस्तुरे, प्रा. रवींद्र ढाले, प्रा. लक्ष्मण मोरे, महेंद्र करुणासागर, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, सिद्धार्थ गायकवाड, वैभव दबगडे, सुभाष माने, भिक्खू ज्ञानज्योती, आचार्य भिक्खू गोविंदो, निर्मला घाडगे, चंद्रकांत खरात, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे, आकाश तिवडे, प्रमोद रास्ते, मिलिंद कांबळे, विशाल मोरे, संतोष आवळे, संतोष सदामते, तानाजी आवळे, कपिल आवळे, नितीन केंचे, शिवाजी पांढरे निलेश मोहिते अजय माने ज्ञानेश्वर केंगार प्रवीण चौगुले आबा सुवासे शितल वाघमारे गणेश खिलारे सिताराम ऐवळे, प्रशांत ढंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.