संपादकीय...
सुधीरदादा गाडगीळ... तसं पाहायला गेलं तर व्यापारी व सरळ, स्वभावाचा सामान्य जनतेत मिसळणारा माणूस..
परंतु भाजपने त्यांना आमदारकीची संधी देऊन भाजपपक्षाचा मान उंचावण्याचं काम भाजपने केले...
शांत, संयमी, स्मित हास्य या जोरावर सर्व जातीपातीतील लोकांना एकवटून कार्य करणारे आ.सुधीर दादा गाडगिळ....
तसं पाहायला गेलं तर सुधीर दादा गाडगीळ यांचा राजकारण मध्ये पिंड नव्हताच ....ते स्वतः एक मोठे व्यापारी आहेत... या पिढीजात व्यापारातून त्यांनी आपली वेगळी शैली व वेगळे स्थान , आणि कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत..
भाजपमध्ये फक्त दोन आमदार होते त्या आधीपासून ते या पक्षाशी एकनिष्ठ राहात व त्यांना मदत करीत
. आज भाजपला सत्तेत आणण्यात सुधीरदादा गाडगीळ यांच्यासारखे प्रामाणिक व जुन्या फळीतील कार्यकर्त्यांच मोठे श्रेय आहे..
ज्या वेळी सांगलीतून आमदारकीसाठी त्यांनी पहिला प्रयत्न केला त्यावेळी पासून सर्व जाती धर्मातील, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी पक्ष न पाहता त्यांना भरून मतदान करून उत्स्फूर्तपणे साथ दिली.. हे फक्त आणि फक्त त्यांच्या स्वभावामुळे..
राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करण्याची संधी विरोधी पक्ष सोडत नाही.. सांगली अर्बन बँकेची रोकड रक्कम मराठवाड्यातून सांगलीकडे येताना भ्रष्टाचाराची रक्कम असल्याचे सांगून त्यांच्या स्वच्छ प्रतिमेस डाग लावण्याचे काम विरोधी पक्षाने केले... पण ते काही सांगलीकरांना रुचले नाही.... यासाठी आम्ही देखील त्याबाबतीत त्या विरोधी लोकांचा खरपूस समाचार घेतला होता... का, तर ही रक्कम सांगली अर्बन बँकेची होती... नंतर त्याचा खुलासा झाला उलगडा झाला...असो ..
म्हणजे
दादांवर ज्यां विरोधकांनी हा आरोप केला त्यांना आम्ही त्याचवेळी आम्ही सडेतोड उत्तर दिलं होतं ..की , ज्यांच्याकडे टनाने सोने आणि पैसा आहे त्यांना हे करायची गरज नाही... असं खडसावून आम्ही त्यांना सांगितलेलं होतं... त्यामुळे ही विरोधी मंडळी गप्प बसली होती..
अशा प्रकरणाने दादाच्या स्वच्छ प्रतिमेला एक डाग लावण्याचा प्रयत्न या विरोधी पक्षाने केला . त्यावेळी दादांना नक्कीच यातना झाल्या होत्या ..राजकारणात हे असच चालते.. परंतु राजकारण आणि दादाच्या स्वच्छ स्वभावात कधी मेळ बसला नाही..
दादांनी आपल्या कार्यशालीतून सर्वांना जवळ घेत आपले राजकारण व कार्य , कामे केली सांगलीमध्ये सर्व समाजासाठी व जाती-धर्मासाठी अशी बरीच काम आहेत की दादांच्या नावावर इतिहासात अजरामर राहतील....
जसं ...हरिपूरचा पुल ..चिंतामणी नगरचा पूल.. जो पूर्णत्वाकडे आहे आहे ,शहरातील मोठे व कॉलनीतील रस्ते, मी ज्या सांगली लोखंड मार्केट अर्थात स्क्रॅप मार्केटचा अध्यक्ष आहे, त्या कोल्हापूर रोड वरील मार्केटमध्ये दादांनी स्वतः हजर राहून डांबरी रस्ते करून देण्याचं मोठं काम केलं... त्यामुळे या लहान लहान 170 दुकानदारांना उद्योग वाढीसाठी त्याचा फायदा झाला व्यापाऱ्यांना मोठी संधी मिळाली..अशी अनेक उदाहरणे देता येतील सांगलीसाठी दादांची तळमळ नेहमीच राहिलेली आहे.. आणि राहणार आहे
मागेच दादांनी मन बनवलं होते की, आता मला काय राजकारणामध्ये रस नाही..
मला माहित असणारी गोष्ट सांगतो... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत, मोदी असोत, शहा असोत, अथवा कोणती ही उच्च अधिकारी व नेते यांना भेटण्यासाठी त्यांना अपॉइंटमेंट लागत नाही... म्हणजे दादांची उंची राजकारणात भाजपमध्ये तर आहेच परंतु सर्व पक्षांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे..
दोन आमदार असणाऱ्या पक्षाने संपूर्ण भारतात आपली सत्ता हस्तगत केली याच सर्व श्रेय.. दादा सारख्या व जुन्या फळीतील कार्यकर्त्यांचे नक्कीच आहे.. परंतु बाहेरून जी ' खोगीर " भरती झाली त्यामुळे मूळ भाजपच्या नेत्यांना आपसूकच बाजूला बसावे लागले... याची खंत देखील दादांना असावी.. ज्या पक्ष कार्यकर्त्यांनी आपल्या परीने स्वतःचा खर्च करत पक्षाला उच्च शिखरावर व सत्ता स्थानी नेले, मात्र तळागाळातील व पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांना त्याचा काही योग्य न्याय मिळाला नसल्याबद्दल देखील दादाना खंत असणार आहे ....
आज देखील सांगलीकरांना व कार्यकर्त्यांना असे वाटते की ,दादांनी राजकारणातून बाहेर पडू नये, परंतु दादांनी मन बनवल असेल तर आपण काय करणार ???
असो.. दादांच्या मागे तमाम सांगलीकर होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत..
दादा आपल्या पुढील कार्यासाठी आमच्या हार्दिक हार्दिक... शुभेच्छा..
सलीम नदाफ :संपादक ;लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई/ सांगली.
8830247886