ओझर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी डॉ.विकास श.पिसाळ-देशमुख यांची बिनविरोध निवड
ओझर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी डॉ.विकास श.पिसाळ-देशमुख यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे . निवडणूक अध्यासी अधिकारी सौ. अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त असलेल्या उपसरपंच पदाकरीता अर्ज सादर करण्याची सूचना देण्यात आली यावेळी डॉ.विकास पिसाळ- देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला.यावेळी अध्यासी अधिकारी यांनी डॉ.विकास पिसाळ यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले यावेळी जेष्ठ नेते श्री उदयसिंह पिसाळ, श्री.विक्रमसिंह पिसाळ, श्री.विजयसिंह पिसाळ, श्री.विश्वजीत ह.पिसाळ, श्री. सुरेश फरांदे, श्री. भाऊसाहेब कदम, श्री.रामभाऊ पिसाळ श्री.आनंदा शेलार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री.शेखर फरांदे, श्री.अतुल कदम, श्री.सत्यजित नेमाडे, कु.हर्षदा फरांदे, सौ.सुनंदा शिंदे, सौ सुरेखा क्षीरसागर, सौ.सुनीता पवार, सौ.रेखा कदम, श्रीमती अनिता जायगुडे सौ.शुभांगी पिसाळ श्री.राहुल विक्रमसिंह पिसाळ,अमित पवार, विलास सोनवणे, मंगेश सोनवणे,कु.शुभम फरांदे,वरून पिसाळ,स्वराज पिसाळ, जगदीश पिसाळ, संस्कार पिसाळ, इम्रान शेख पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी श्री.संजय वर्णेकर यांनी उपसरपंच निवडीचे कामकाज पाहिले. डॉ.विकास पिसाळ यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल आमदार श्री. मकरंद आबा पाटील व सातारा राज्यसभेचे खासदार श्री.नितिन काका पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई/ सातारा
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
7709504356


