LOKSANDESH NEWS
चांदीवली मध्ये आमदार दिलीप लांडे यांनी समतेची धुळवड केली साजरी
चांदीवली मध्ये आमदार दिलीप लांडे यांनी समतेची धुळवड साजरी केली. यावेळी परिसरातील सर्व धर्मातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी इको फ्रेंडली धुळवड साजरी केली.
चांदिवली परिसरात मिश्र वस्ती असल्यामुळे या परिसरात धुळवडीच्या दिवशी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी आमदार दिलीप लांडे यांनी सर्व धर्मीयांना एकत्र येत समतेची धुळवड साजरी करण्याचा आवाहन केलं होतं.
त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार न घडता या ठिकाणी इको फ्रेंडली धुळवड साजरी करण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली