LOKSANDESH NEWS
कांदिवली पूर्वेकडील ‘ग्रॉवेल्स मॉल’उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद;
अनेक कामगारांना नोकरी जाण्याची भीती
कांदिवली पूर्व आकुर्ली रोड येथील ‘ग्रॉवेल्स १०१ मॉल’चे बांधकाम पर्यावरणविषयक मंजुरी न घेताच करण्यात आले आणि ते सुरूही करण्यात आले, याची गंभीर दखल घेत ते बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ५ मार्च रोजी बजावलेल्या आदेशाविरोधात कंपनीने केलेली याचिका फेटाळून लावतानाच आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्या. महेश सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने दिले.
कांदिवली पूर्वेकडील ग्रोव्हल्स मॉल गेल्या 4 दिवसांपासून बंद आहे. या मॉलमध्ये सुमारे दोन ते तीन हजार लोक काम करतात. जर हे मॉल बंद झाले तर हजारो लोक बेरोजगार होतील. याचा परिणाम ऑटो रिक्षा व्यवसायावरही होईल. नोकऱ्या गमावण्याची भीती कामगारांना आहे. त्याच्या कुटुंबाचा खर्च त्याच्यावर अवलंबून आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली