LOKSANDESH NEWS
पाच दिवसानंतर आज पासून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु, कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण
पाच दिवसा पासून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांद्याचे लिलावं आज पासून सुरु झाले असून, लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण झाली आहे.
पाच दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला होता त्यात 250 रुपयांची घसरण होऊन आज 1250 रुपये इतकाच भाव मिळाला आहे.
केंद्र सरकार ने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र भाव वाढण्या ऐवजी उलट घसरण होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली